Urfi Javed Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed: उर्फीनं तर कहरच केला, 'जबरा' फॅनची इच्छा केली पूर्ण; बोल्ड व्हिडिओ शेअर केल्यानं सगळेच हैराण

आता पुन्हा एकदा नव्या पोस्टने उर्फी सोशल मीडियावर चर्चेत येण्याची शक्यता आहे, तिच्या या पोस्टने अखेर चित्रा वाघ यांची इच्छा पूर्ण झाली आहे.

Chetan Bodke

Urfi Javed: टेलिव्हिजन अभिनेत्री उर्फी जावेद सध्या कमालीची चर्चेत आहे. उर्फी आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात बरीच खडाजंगी रंगताना दिसून येत आहे. ऐकेल ती उर्फी कसली, तिच्या विरोधात इतके वाद होत असले तरी तिला त्याचा काही फरक पडत नाही. गेल्या बऱ्याच दिवसांपासून उर्फी वेगवेगळ्या स्टाईलचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहे. आता पुन्हा एकदा नव्या पोस्टने उर्फी सोशल मीडियावर चर्चेत येण्याची शक्यता आहे, तिच्या या पोस्टने अखेर चित्रा वाघ यांची इच्छा पूर्ण झाली आहे.

काही राजकीय नेत्यांनी तिच्या विरोधात अनेकदा पोलीस स्थानकात तक्रारही दाखल केली आहे. तरी पण तिच्या डोक्यात कोणताच फरक पडत नाही. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गेल्या आठवड्यात पोलीस स्थानकात तक्रार दाखल करत तिला अटक करण्याची मागणी केली होती. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तिने भलताच पराक्रम केला आहे.

नेहमीच हॉट आणि बोल्ड अंदाजात असलेल्या उर्फीच्या हातात पोलिसांच्या बेड्या दिसून आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा तिच्या अटकेची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी जावेद काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अतिशय हॉट बिकिनी परिधान केलेली दिसुन येत आहे. तिच्या या किलर स्टाईलने चाहत्यांचे मन घायाळ केले आहे. उर्फीचा हा हॉट अंदाज पाहून चाहत्यांची नजर तिच्यावरुन हटत नाही.

या व्हायरल व्हिडिओमध्ये उर्फी जावेदने लांब सडक वेणी बांधत बोल्ड मेकअप आणि डार्क लिपस्टिक लावत मेकअप केला आहे. इतकंच नाही तर हातात पोलीसांच्या बेड्या ही घातलेल्या दिसत आहे. तिच्या या स्टाईलची सर्वत्र कमालीची चर्चा होत आहे. हा व्हिडीओ शेअर करत उर्फी जावेदने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तुम्हाला मला हातात बेड्या घातलेल्या रुपात पाहायचे होते ना?' या व्हिडीओला फार कमी वेळेत बऱ्याच नेटकऱ्यांनी व्हिडीओ पाहिली आहे.

एकीकडे उर्फीच्या या स्टाइलचे सर्वांनाच वेड लागले आहे. एका यूजर कमेंट करत म्हणतो, तुरुंगात जा मग कायमचे. आणखी एका युजर म्हणतो, तू नेहमी तोंड उघडे का ठेवतेस, शूटिंगच्या वेळी झोप येते का? तर आणखी एक युजर म्हणतो, उर्फी जावेद ऐन थंडीत कपडे मिळत नसल्याने असे फोटोशूट करते का, किती संघर्ष करते बिचारी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

साईबाबांच्या दर्शनाने अंध मुलाला दृष्टी? साई मंदिरात अंधश्रद्धा की चमत्कार?

Pune Accident News : देवदर्शन घेऊन निघाले, ४ किमीनंतर भयानक अपघात, नवले ब्रिजवर अख्ख्या कुटुंबाचा अंत

Maharashtra Live News Update: नवले ब्रीज अपघात प्रकरणी मुरलीधर मोहोळ घटनास्थळी पाहणी करणार

लग्नसराईत सोनं स्वस्त! २४ कॅरेट १० तोळं सोन्याचे भाव ८ हजारांनी घसरले, वाचा आजचा लेटेस्ट दर

Bihar Election Result Live Updates: तेजस्वी यादव फक्त ८०० मतांनी आघाडीवर

SCROLL FOR NEXT