Sairaj Kendre Entry In Appi Amchi Collector Serial
Sairaj Kendre Entry In Appi Amchi Collector Serial Instagram
मनोरंजन बातम्या

Sairaj Kendre: 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' फेम साईराज केंद्रेची लोकप्रिय मालिकेत एन्ट्री; प्रोमो आला समोर

Chetan Bodke

Sairaj Kendre Entry In Appi Amchi Collector Serial

कायमच सोशल मीडियावरील रिल्स तुफान व्हायरल होत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी ‘आमचे पप्पांनी गणपती आणला’ गाण्यावर प्रचंड रिल्स व्हायरल झाले होते. या गाण्यावरील साईराज केंद्रेचा रिल इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल झाला होता. तेव्हापासून त्याला फार मोठी प्रसिद्धी मिळाली. आता रिलस्टार साईराज केंद्रे टीव्ही सिरीयलच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच त्याचा टीझर सोशल मीडियावर रिलीज झालेला आहे.

सोशल मीडियावर प्रसिद्धीझोतात आलेला साईराज केंद्रे आता छोट्या पडद्यावर एंट्री घेणार आहे. झी मराठीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या लोकप्रिय मालिकेमध्ये तो झळकणार आहे. ज्याचा प्रोमो समोर आला आहे. मालिकेमध्ये, साईराजने अप्पी आणि अर्जुनच्या मुलाचे पात्र साकारले आहे. येत्या १ मे पासून मालिकेमध्ये, ७ वर्षांचा लीप येणार आहे. अप्पी आणि अर्जुनच्या आयुष्यातील पुढील प्रवास पाहायला मिळणार आहे. नुकतंच झी मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवर प्रोमो शेअर करण्यात आलेला आहे. या शेअर केलेल्या प्रोमोमध्ये, अप्पी आणि अर्जुनचा मुलगा मोठा झालेला दिसत आहे. अप्पी आणि अर्जुनच्या मुलाचे पात्र साईराजने साकारले. (Tv Serial)

अप्पी अर्जुनला त्यांचं बाळ सापडलं आहे. पण अप्पी या बाळाला सगळ्यांपासून दूर जाणार आहे. ती अर्जुनला वचन देते, ती त्यांच्या मुलाला वडिलांबद्दल कधीच काही सांगणार नाही. अप्पी त्यानंतर उत्तराखंड मध्ये कलेक्टरचं कर्तव्य बजावताना दिसत आहे. प्रोमोमध्ये, अप्पी आणि तिचा मुलगा एका देवळात गेले आहेत. याचं देवळात अर्जुन देखील येतो. अर्जुन आपल्याच मुलाला उचलून घेतो. पण त्याला तो आपला आहे, हे माहित नसते. आता साईराजच्या येण्याने प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. त्याच्या एन्ट्रीने मालिकेमध्ये, कोणतं नवं वळण येणार ?, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. (Zee Marathi)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Health: दररोज करा हे 2 योगासन, यकृत राहील निरोगी

Liver Health: यकृताचे आरोग्य सुधारण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Dharashiv Crime : कळंब शहरात दुकानावर दरोडा; १ लाख रुपये व सोने चांदीच्या दागिन्यांची चोरी

Today's Marathi News Live: दादरमधील रेस्टॉरंट बॉम्बने उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ

Rinku Singh- Yash Dayal: एका ओव्हरमध्ये ५ षटकार मारणाऱ्या रिंकूची यश दयालसाठी खास पोस्ट - Photo

SCROLL FOR NEXT