Mrunal Thakur On Body Shaming : "पूर्वी भीती वाटायची पण आता..."; मृणाल ठाकूरने बॉडी शेमिंगवर व्यक्त केलं परखड मत

Mrunal Thakur Interview : मृणाल ठाकुरने एका मुलाखतीमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी महत्वाचे विधान केले आहे.
Mrunal Thakur On Body Shaming
Mrunal Thakur On Body ShamingSaam Tv

Mrunal Thakur On Body Shaming

दाक्षिणात्य अभिनेत्रींच्या कामाची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा होते. अशातच सध्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीची फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, टॉलिवूडमध्येही प्रचंड चर्चा होत आहे. ही दुसरी तिसरी कोणीही नसून धुळ्याची मृणाल ठाकूर आहे. कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या मृणालने गेल्या काही दिवसांपूर्वी एक दु:खी चेहरा असलेला फोटो इन्स्टा स्टोरीवर शेअर केलेला होता. त्या फोटोबाबत अभिनेत्रीने एका मुलाखतीतून स्पष्टीकरण दिले आहे. मुलाखतीमध्ये मृणालने बॉडी शेमिंगवरही महत्वाचं विधान केले आहे.

Mrunal Thakur On Body Shaming
Shalva Soon Tie Knot With Shreya : आणखी एक टिव्ही कपल बांधणार लवकरच लगीनगाठ, शाल्व-श्रेयाच्या घरी लगीनघाई सुरू

मृणालने नुकतेच 'ह्युमन्स ऑफ बॉम्बे'ला मुलाखत दिली. मुलाखतीत तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल भाष्य केले आहे. अभिनेत्री मुलाखतीमध्ये म्हणाली की, "प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये, चांगले किंवा वाईट दिवस येतात. त्याचा आपल्या जीवनावर कोणताही प्रभाव पडू द्यायचा नाही. माझ्या जीवनामध्ये असे काही दिवस होते, तेव्हा मला बिछान्यावरून उठायला होत नव्हते. मला उदास वाटत होते. पण मी इतर कोणासाठी नाही, तर माझ्या स्वत:साठी उठले. मला एक दिवस, दोन दिवस, आठवडाभर किंवा जास्तीत जास्त महिनाभर उदास वाटेल. आपल्या आपल्या कुटुंबाशिवाय आपली इतर कोणीही काळजी करत नाही." (Tollywood)

अभिनेत्री आपल्या मुलाखतीमध्ये पुढे म्हणाली, " मला वाटतं की, जसे आपल्या जीवनात वाईट दिवस येतात, तसेच चांगले दिवसंही आपल्या जीवनात येतात, ही गोष्ट स्वत:ला लक्षात आणून देण्याची गरज आहे." शिवाय, मृणालने बॉडी पॉझिटिव्हिटीबद्दलही मत मांडले. अनेकदा बॉडी शेमिंगचाही तिला सामना करावा लागल्याचे तिने सांगितले. ती म्हणाली, "मला बऱ्याचदा शरीराच्या एका विशिष्ट आकाराबद्दल निगेटिव्ह कमेंट मिळालेल्या आहेत. मी आता माझ्या बॉडी कर्व्ह्सला (Body Curves) दाखवून सुंदरतेची व्याख्या बदलणार आहे. यापूर्वी मला भीती वाटायची. पण, आता मला त्याविषयी काहीही वाटत नाही. स्त्री सौंदर्याची मानके ठरवण्यासाठी आपल्याला कार्दशियनची आवश्यकता आहे?" रस्त्यावर चालणारी प्रत्येक भारतीय महिला जी सुडौल आहे, ती सुंदर असल्याचे मत मृणालने व्यक्त केले. (Social Media)

Mrunal Thakur On Body Shaming
Salman Khan Firing Case : सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; पंजाबमधून आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

कोणतेही नातं निभावणे फार कठीण असते. त्यामुळे योग्य पार्टनर शोधणं ही महत्वाची बाब आहे. त्याने आपल्या कामाचे स्वरूप समजून घेत, त्याने आपल्यालाही समजून घ्यायला हवे. असं मृणाल नातेसंबंधांबद्दल म्हणाली आहे. मृणाल ठाकूरच्या कामाविषयी बोलायचे तर, मृणाल शेवटची विजय देवरकोंडासोबत 'द फॅमिली स्टार' चित्रपटात दिसली होती. चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर केवळ २० दिवसांत ओटीटीवर रीलिज झाला आहे. चित्रपट २६ एप्रिलला 'ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ'वर लाईव्ह स्ट्रीम झालेला आहे. (Entertainment News)

Mrunal Thakur On Body Shaming
Samantha Ruth Prabhu : समांथाच्या फॅशनचा थाटच न्यारा, हटक्या पद्धतीने कॅरी केला वेडिंग गाऊन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com