Aai Kuthe Kay Karte Latest Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aai Kuthe Kay Karte: अखेर आशुतोषला त्याचं उत्तर मिळालंच.... लाजत का होईना अरूंधतीने दिली प्रेमाची कबुली

I love you, Arundhati told Ashutosh: दोघांनीही लग्न जरी केलं असलं तरी, अरुंधतीने आशुतोषवरच्या प्रेमाची कबुली दिली नव्हती. त्याला तिच्याकडून प्रेमाचे तीन महत्वाचे शब्द ऐकायचे होते. अखेर आजच्या भागात प्रेक्षकांना ते उत्तर पाहायला मिळणार आहे.

Chetan Bodke

Aai Kuthe Kay Karte Latest Episode: नेहमीच टीआरपीमध्ये अव्वल ठरलेली ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सोशल मीडियावर बरेच चर्चेत आहे. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मालिका सध्या एका वेगळ्याच वळणावर गेलेली दिसते. अरूंधती आणि आशुतोषने मालिकेत लग्नगाठ बांधल्यानंतर या मालिकेची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू झाली होती.

दोघांमधील प्रेम, एकमेकांनी आपल्या प्रेमाची दिलेली कबुली सध्या प्रेक्षकांचं आकर्षनाचा मुद्दा ठरला आहे. दोघांनीही लग्न जरी केलं असलं तरी, अरुंधतीने आशुतोषवरच्या प्रेमाची कबुली दिली नव्हती. त्याला तिच्याकडून प्रेमाचे तीन महत्वाचे शब्द ऐकायचे होते. अखेर आजच्या भागात प्रेक्षकांना ते उत्तर पाहायला मिळणार आहे.

अरूंधती आशुतोषवर असणाऱ्या प्रेमाची कबुली आजच्या भागात देणार आहे. सध्या या मालिकेत प्रेमाचे वारे वाहत आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता आशुतोषवर असणाऱ्या प्रेमाची कबुली अरूंधती मान खाली घालून तरी का होईना आजच्या भागात उत्तर देणार असल्याने आशुतोषचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. प्रेमाचे तीन महत्वाचे शब्द ऐकून आशुतोषच्या चेहेऱ्यावरील आनंद ओसंडून वाहताना आजच्या भागात दिसणार आहे.  (Marathi Film)

अरुंधतीनं खास आपल्या लाडक्या लेकीच्या साखरपुड्यासाठी तिला देण्यासाठी काही दागिने खरदे केले आहेत. ते दागिने ईशाला आवडणार की नाही, असं अरूंधती आशुतोषला विचारते. त्यानंतर त्यांच्यात बऱ्याच गप्पा रंगतात.

ईशा आणि अनिषच्या जोडीबद्दल बोलत असतानाच आशुतोष अरुंधतीला ‘आय लव्ह यू’ बोलतो. यावर किती वेळा तुम्ही हे बोलणार आहात, असं अरुंधती लाजत विचारते. अरुधंतीच्या या प्रश्नावर आशुतोष म्हणतो, जो पर्यंत तू मला ‘आय लव्ह यू’ बोलत नाही, तोपर्यंत.

इथं आपल्या दोघांशिवाय कुणीच नाही. तरी देखील तू बोलत नाही. असं आशुतोष म्हणतो. पण जो पर्यंत तू मला आय लव्ह यू बोलत नाहीतस , तो पर्यंत मी तुला कुठंही, कोणा समोरही आय लव्ह यू बोलणार, असा गोड प्रेमाचा हट्ट आशुतोष अरूंधतीसमोर ठेवतो. त्याच्या हट्टापायी अरूंधती अखेर ‘आय लव्ह यू’ म्हणते. ते ऐकून आशुतोषला प्रचंड आनंद होतो. (Entertainment News)

सोबतच प्रेक्षकांना, आजच्या भागात कांचनताई ईशाला चांगलेच खडेबोल सुनावणार आहेत. सध्या त्यांच्या घरी ईशा आणि अनिषच्या साखरपुड्याची तयारी सुरु आहे. दिवसेंदिवस साखरपुड्यासाठी ईशाच्या मागण्यांमध्ये वाढ होतानाच दिसत आहे. सोन्याचे दागिने घेतल्यावर आता ईशा कांचनताईंना थेट हिऱ्यांच्या दागिन्यांचीच डिझाइन दाखवणार आहे. त्यावरून कांचनताई तिला समज देत म्हणतात, ‘तू जेव्हा कमवायला लागशील तेव्हा तू तुझ्यासाठी हिऱ्याचे दागिने घे. हे दागिने आमच्याकडून आहेत. आमची ऐपत आहे तेवढंच आम्ही तुला देणार आहोत’ असं म्हणत तिची कानउघडणी आजच्या भागात करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत खळबळ! हायप्रोफाईल एरियात मॉडेलच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

IND T20 WC 2026: शनिवारी टी-२० वर्ल्डकपचा थरार! टीम इंडिया कोणासोबत करणार दोन हात, १५ शिलेदार कोणते, A टू Z माहिती एका क्लिकवर

Mumbai News: IIT बॉम्बेमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या, हॉस्टेलच्या इमारतीवरून मारली उडी

Video Viral: रिलसाठी काहीपण!!! धावत्या लोकलमध्ये लटकत तरूणीचा स्टंट, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT