Rochelle Rao-Keith Sequeira Baby Bump Photos Instagram
मनोरंजन बातम्या

Rochelle-Keith Baby Bump Photos: लग्नानंतर ५ वर्षांनी फेमस सेलिब्रिटी कपलनं दिली गोड बातमी; समुद्रकिनाऱ्यावरचं फोटोशूट चर्चेत

Rochelle Rao-Keith Sequeira Baby Bump Photos: बॉलिवूड अभिनेता किथ सिक्वेरा आणि त्याची पत्नी अभिनेत्री रोशेल राव लवकरच चाहत्यांना गुड न्यूज देणार आहेत.

Chetan Bodke

Rochelle Rao Announces Pregnancy: बॉलिवूड अभिनेता किथ सिक्वेरा आणि त्याची पत्नी अभिनेत्री रोशेल राव लवकरच चाहत्यांना गुड न्यूज देणार आहेत. किथ आणि रोशेलने बुधवारी (२ ऑगस्ट) चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. या जोडीने समुद्रकिनाऱ्यावर केलेलं फोटोशूट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. किथ सिक्वेरा आणि रोशेल राव हे दोघेही पहिल्या बाळाचे स्वागत करण्यासाठी सज्ज असल्याचं पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे.

शेअर केलेल्या फोटोशूटमध्ये रोशेल रावने फिकट गुलाबी रंगाचा तर किथ सिक्वेरानेही आपल्या पत्नीला मॅचिंग शर्ट आणि ब्लॅक पँड घातली आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या एका फोटोत रोशेलच्या बेबी बंपवर कान ठेवत समुद्राजवळ पोज देताना दिसली होती. तर पुढच्या फोटोत किथने पत्नी रोशेलसोबत एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे.

कपलने बेबी बंप दाखवताना फोटोला कॅप्शन दिली की, “दोन छोटे हात, दोन छोटे पाय, एक गोंडस मुलाला किंवा मुलीला पाहण्यासाठी आम्ही आता वाट पाहू शकणार नाहीत. होय, तुम्ही अगदी बरोबर अंदाज लावलात, लवकरच आम्ही पालक होणार आहोत. या अविश्वसनीय भेटीसाठी प्रभू येशूंचे आणि तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी सर्वांचेच आभार. या नवीन प्रवासात आम्हाला आशीर्वाद द्या आणि आमच्यासाठी प्रार्थना करत राहा.”

आपल्या आवडत्या सेलिब्रिटीने आनंदाची बातमी दिल्यामुळे चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. किथ सिक्वेरा आणि रोशेल राव या क्यूट कपलने २०१८ मध्ये तामिळनाडूच्या महाबलीपुरममध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या आधीपासून ते एकमेकांना डेट करत होते. त्या दोघांनीही २०१५ मध्ये ‘बिग बॉस ९’ तर २०१९ मध्ये ‘नच बलिए’मध्ये एकत्रित सहभाग नोंदवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

Mumbai Firing : मुंबई हादरली! 32 वर्षीय तरुणीवर गोळीबार, परिसरात खळबळ

Tharवाल्याचा विकृतपणा! आधी कट मारला, नंतर रिव्हर्स घेत वृद्धाच्या अंगावर घातली भरधाव कार|Video Viral

Pune Rave Party : एकनाथ खडसेंचा जावई अडकला की, अडकवला? पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात आता नवा ट्विस्ट

CPR Controversy : महिलेला CPR देणे शिक्षकाला पडलं महागात; चुकीच्या पद्धतीने हात लावल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT