Nilu Kohli's Husband Death
Nilu Kohli's Husband Death Instagram @nilukohli
मनोरंजन बातम्या

Nilu Kohli: अभिनेत्री निलू कोहलीवर कोसळला दुःखाचा डोंगर

Saam Tv

 Actress Nilu Kohali Husband Passes Away: हिंदी टीव्ही आणि चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री निलू कोहलीच्या पती हरमिंदर सिंह कोहली यांचे निधन झाले आहे. काल म्हणजे २४ मार्चला ही घटना घडली. त्यांची प्रकृती उत्तम होती. दुपारी गुरुद्वारामधून घरी आल्यानंतर ते बाथरूममध्ये मृत अवस्थेत आढळले.

हरमिंदर सिंह यांच्या मृत्यू समयी त्यांची मदतनीस (केअर टेकर) घरी होती. गुरुद्वारातून आल्यानंतर ते बाथरूममध्ये गेले खूप उशीर झाला तरी ते दिसले नाहीत म्हणून त्यांच्या केअर टेकरने त्यांना घरात शोधण्यास सुरुवात केली. तेव्हा तिला बाथरूममध्ये पडले होते. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले परंतु खूप उशीर झाला होता.

निलू कोहलीची मुलगी साहिबाने टाइम्सला याबाबत अधिकृत माहिती दिली. तिने सांगितले की, "होय हे खरे आहे. ही घटना आज (24 मार्च) दुपारी घडला. पप्पा अचानक आम्हला सोडून गेले. माझा भाऊ मर्चंट नेव्हीमध्ये असल्यामुळे दोन दिवसांनी अंतिम संस्कार केले जातील, आम्ही त्याची वाट पाहत आहोत. माझ्या आईची प्रकृती ठीक नाही. घटनेच्या वेळी ती काही कामानिमित्त बाहेर गेली होती."

निलूची मैत्रिण वंदना हिने नवभारत टाइम्सला दिलेल्या माहितीत सांगितले की, हरमिंदरची प्रकृती ठीक होती आणि आज दुपारी ते गुरुद्वारात देखील गेले होते. ही घटना दुपारी दीडच्या सुमारास घडली. मदतनीस स्वयंपाकघरात जेवण बनवत होती. तिला ते बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले. तर वंदनाने असेही सांगितले की हरमिंदरला शुगर होती पण ते ठीक होते.

निलू कोहलीने त्यांच्या करिअरची सुरुवात 'दिल क्या करे' या बॉलिवूड चित्रपटातून केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. त्या नुकत्याच 'जोगी' या पिरियड ड्रामामध्ये दिसल्या होत्या. याशिवाय त्या अलीकडेच 'ये झुकी झुकी सी नजर' या टीव्ही शोमध्ये दिसल्या होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

SCROLL FOR NEXT