Namrata Sambherao Shared On Why She Exit Kurrr Natak Instagram
मनोरंजन बातम्या

Namrata Sambherao Post: ‘काळजावर दगड ठेवून घेतलेला निर्णय...’; ‘कुर्रर्रर्रर्र’ नाटक सोडल्यानंतर नम्रताने सोडलं मौन

Namrata Sambherao News: अभिनेत्री नम्रता संभेरावने चाहत्यांसोबत नाटक का सोडलं?, यामागील कारण पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे.

Chetan Bodke

Namrata Sambherao Shared On Why She Exit Kurrr Natak

सध्या नम्रता संभेराव ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटामुळे आणि ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकामुळेही ती चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ‘कुर्रर्रर्रर्र’ नाटकाची निर्माती विशाखा सुभेदारने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसाद खांडेकरने आणि नम्रता संभेरावने नाटकातून काढता पाय घेतल्याचे सांगितले. या बातमीने खरंतर सर्वांनाच फार मोठा धक्का बसला. नुकतंच अभिनेत्री नम्रता संभेरावने चाहत्यांसोबत नेमकं तिने नाटक का सोडलं?, यामागील कारण सांगितलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नम्रता संभेरावने नुकतंच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये नम्रता म्हणाली, “ ‘कुर्रर्रर्रर्र’ ह्या नाटकातली माझी भूमिका पूजा I मी माझ्या भूमिकेला खूप मिस करतेय. शो मस्ट गो ऑन. माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचं नाटक. माझी भूमिका मी अक्षरशः जगले. माझ्या आयुष्यातलं अभिनयाचं पहिलं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं बक्षीस ह्याच नाटकाने मिळवून दिलं मला. कोविड काळानंतर आम्ही कलाकारांनी एकमेकांच्या विश्वासावर उभं केलेलं हे नाटक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं प्रेम केलं.” (Drama)

“अत्यंत व्यस्त शेड्युल्डमधून आम्ही ‘कुर्रर्रर्रर्र’ ह्या नाटकाचे २ वर्षात २०० हुन अधिक प्रयोग केले. पण व्यस्त तारखांमुळे प्रयोगांची संख्या कमी झाली. बॅकस्टेज आणि सहकलाकारांना जास्तीत जास्त प्रयोग करता यावेत, नाटकाचे आणखी भरघोस प्रयोग व्हावे, ह्यासाठी सर्वानुमते घेतलेला हा निर्णय आहे. काळजावर दगड ठेवून घेतलेला निर्णय काय असतो पहिल्यांदा अनुभवला पण हा निर्णय चांगल्या भावनेने घेतला गेला आहे. नाटकासाठीच घेतला आहे आणि तुम्ही रसिक प्रेक्षक आमच्या निर्णयाचा मोठ्या मनाने स्विकार कराल अशी खात्री आहे.” (Marathi Actress)

“ह्यापूर्वी जसं प्रेम केलंत तसंच प्रेम तुम्ही रसिक प्रेक्षक आमच्या ‘कुर्रर्रर्रर्र’ नाटकावर नवीन संचावर कराल अशी अशा आहे, मी अजूनही आमच्या म्हणतेय कारण शारीरिक रित्या एक्झिट घेतली तरी त्या नाटकाशी मी मनाने जोडले गेलेय, तिथून कधीच एक्झिट होत नसते. माझ्या शुभेच्छा कायम सोबत असतील. जिची खरंच कुठे शाखा नाही. अशी विशाखा ताई विनोदाचा बाप पॅडी दादा माझी अत्यंत जवळची मैत्रीण मयुरा रानडे आणि सुप्रिम प्रियदर्शन दादा तुम्हाला व ‘कुर्रर्रर्रर्र’च्या सर्व टीम ला पुढील प्रयोगांसाठी हाऊसफुल्ल शुभेच्छा. रंगमंचापासून फार काळ लांब राहूच शकत नाही. भेटू लवकरच....” असं नम्रता आपल्या पोस्टमध्ये म्हणाली आहे. (Entretainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सोलापूरकरांनी कोणाला दिला कौल? विजयाची वैशिष्ट्ये काय?

Maharashtra Assembly Election Result: तुमचा आमदार कोण? २८८ मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी पाहा

Aaditya Thackeray: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; वरळीतून आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा आमदार

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

Dheeraj Deshmukh: लातूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, धीरज देशमुख यांचा पराभव

SCROLL FOR NEXT