Milind Gawali And Gracy Singh Chanchal Film Saam Tv
मनोरंजन बातम्या

Milind Gawali Post: मिलिंद गवळीने ‘लगान’मधील अभिनेत्रीसोबत केलंय काम; पण चित्रपटच प्रदर्शित झाला नाही...

Milind Gawali And Gracy Singh Film: मिलिंद गवळीने 'नायक' फेम अभिनेत्री ग्रेसी सिंगसोबत 'चंचल' एकत्र चित्रपटामध्ये काम केले होते. पण दुर्दैवाने त्यांचा तो चित्रपट कधी प्रदर्शितच होऊ शकला नाही.

Chetan Bodke

Milind Gawali And Gracy Singh Chanchal Film

मराठमोळा अभिनेता मिलिंद गवळीला ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्धी मिळाली आहे. अभिनेत्याने अनेक मराठी चित्रपटांसोबतच काही हिंदी चित्रपटांतही प्रमुख भूमिका केली आहे. सध्या एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे अभिनेता चर्चेत आला आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने त्याच्या एका जुन्या हिंदी चित्रपटाबद्दल चाहत्यांना सांगितले आहे. मिलिंद गवळीने 'नायक' फेम अभिनेत्री ग्रेसी सिंगसोबत 'चंचल' एकत्र चित्रपटामध्ये काम केले होते. पण दुर्दैवाने त्यांचा तो चित्रपट कधी प्रदर्शितच होऊ शकला नाही. (Television Actor)

तिने अनेक लोकप्रिय बॉलिवूड कलाकारांसोबत स्क्रिन शेअर केलेली आहे. त्या चित्रपटामध्ये ग्रेसी सिंग आणि मिलिंद गवळी प्रमुख भूमिकेत होते. या दोघांवरही चित्रपटातील एक रोमँटिक गाणं चित्रित झालं होतं. मिलिंद यांनी 'चंचल' चित्रपटाबद्दल आपल्या भावना व्यक्त करत इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. सोबतच एका गाण्याचा व्हिडीओही त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेला आहे. (Marathi Actors)

मिलिंद गवळीने पोस्टमध्ये लिहिलंय की, “ “रंग माझा वेगळा", “हम काले है तो क्या हुआ दिलवाले है, हम तेरे तेरे चाहने वाले है”, “गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण”, लहानपणापासून गोरं असणं म्हणजे सुंदर अशी धारणा आजूबाजूच्या लोकांनी करून दिली होती. “किती छान गोरा आहे वा किती सुंदर गोरी आहे” हेच सतत कानावर पडत आलं होतं, फेअर अँड लव्हलीचा खप उगाच नाही वाढला आपल्या देशात...” (Tv Serial)

“हळूहळू जसजसा मी मोठा होत गेलो तसं तसं माझ्या लक्षात आलं. माझी आई तिच्या सगळ्या बहिणींपेक्षा सावळी होती पण ती त्या सगळ्यांपेक्षा खूपच सुंदर होती! माझा खरा रंग कोणता आहे मला पूर्वी शाळा कॉलेजात कधी कळलं नाही, आपल्या चेहऱ्याचा रंग काळा असावा असंच मला वाटत होतं, सतत गोट्या ,भवरे, पतंग, क्रिकेट, सायकल चालवणे, उन्हात भटकणे हाच कार्यक्रम असायचा त्यामुळे, सतत उन्हात रापलेला चेहरा, काळा कुट्ट असायचा, त्यामुळे आई शिवाय दुसरं कोणीही मला ‘तू छान आहेस‘ ‘सुंदर आहेस‘ ‘गोड दिसतोस‘ वगैरे असं कधी कुणी म्हटलं नाही, कदाचित माझ्या आईला माझ्या चेहऱ्यापलीकडचा आतला मनातला रंग दिसत असावा. ” (Bollywood Actress)

“मग मोटरसायकल चालवणं सुटलं आणि हळूहळू माझ्या चेहऱ्याचा रंग उजळत गेला, मग मला कळलं की मी सावळ्या रंगाचा आहे, आणि हाच रंग आपल्या संपूर्ण भारतीयांचा पण आहे, अमेरिकेत युरोपमध्ये गोरे आफ्रिकेमध्ये काळे आणि एशियामध्ये सावळे गव्हाळ रंगाचे माणसं असतात. मग मला कळलं की “beauty lies in the eyes of the beholder” आणि खरंच रंगावर काहीच नसतं. दुबईच्या सिटी मॉलमध्ये उभा असताना मला जगातल्या विविध रंगांच्या लोकांचं दर्शन झालं pink eskimos पाहिली, दुधापेक्षा पांढरीशुभ्र माणसं पाहिली, कोळशापेक्षा काळी कुट्ट माणसे पाहिलेत, जगातल्या वेगळ्या वेगळ्या भागातल्या माणसांची वेगळे वेगळे रंग आणि सगळ्यांमध्ये आपापले एक वेगळंच सौंदर्य, अदाचीत त्या दिवसापासून मी माझ्या skin मध्ये comfortable आलो. ” (Bollywood News)

“त्या दिवसापासून मी आहे तसा स्वतःला Accept करायला लागलो. Grass is always greener on the other side , जे सावळे असतात त्यांना गोरं व्हायचं असतं, आणि गोरे लोक tan होण्यासाठी आमच्या गोव्यामध्ये येऊन sunbathing करतात, I think we should accept the way we are, As long as our Skin is healthy and glowing, it does not matter what the colour of your skin is. निरोगी शरीर आणि त्वचा हे सौंदर्याचं रहस्य आहे. ह्या 'चंचल' चित्रपटात काळ्या गोऱ्या रंगाचाविषय मांडला होता. दुर्दैवाने तो लोकांसमोर आलाच नाही, ही माझी फिल्म रिलीज झालीच नाही.” (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT