Prajakta Mali And Aditi Tatkare Photo Instagram
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali And Aditi Tatkare Photos: ‘दोघींनीही एकत्र काम करावं का?’ प्राजक्ता माळीने मंत्री आदिती तटकरेंना विचारला जबरदस्त प्रश्न; फोटोवर फॅन्स म्हणाले...

Prajakta Mali And Aditi Tatkare News: नुकतंच प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासोबतच्या भेटीचा एक फोटो पोस्ट केला आहे.

Chetan Bodke

Prajakta Mali And Aditi Tatkare Photo

‘रानबाजार’ फेम अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर कायमच आपल्या हटक्या अंदाजातील स्टाईलमुळे चर्चेत असते. अभिनेत्री आणि होस्ट म्हणून सर्वत्र प्रसिद्ध झालेल्या प्राजक्ताने नुकताच एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये तिने राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासोबतच्या भेटी दरम्यानचा एक फोटो पोस्ट केला आहे. भेटी दरम्यानचा फोटो शेअर करताना प्राजक्ताने त्यांच्याबद्दल स्पेशल पोस्टही लिहिली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्राजक्ता आपल्या पोस्टमध्ये म्हणते, “महिला व बाल विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य की लाईफ टाईमसाठी मैत्रिण?, मा. आदितीताई तटकरे. स्वतः महिला व नाव “आदिती”चं असल्याने महिलांचे प्रश्न जाणून स्त्री शक्तीस आधार देणारं खंबीर, झंझावाती नेतृत्व त्यांच्यात आहे. त्याबरोबरीने लेझर शार्प फोकस, असामान्य बुद्धिमत्ता, दयाळू स्वभाव, दिव्यदृष्टी आणि त्वरित निर्णय घेण्याची क्षमता मला खूप प्रेरणा देते.”

प्राजक्ता पुढे आपल्या पोस्टमध्ये म्हणाली, “मला त्यांना जवळून भेटता आलं, याचा आनंद आहे. काल रात्री आम्ही दोघींनी धमाल मस्ती केली. एकमेकींची विचार करण्याची क्षमता सुद्धा सारखीच आहे. आपण नेहमीच भेटायला हवं आणि महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणासाठी आपण एकत्रही काम करायला हवे. आपण करावं का?” अशी पोस्ट प्राजक्ताने चाहत्यांसोबत शेअर केली. आणि पुढे मंत्री आदिती तटकरे यांना टॅगही केले आहे.

प्राजक्ताच्या या पोस्टवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. ‘प्राजू.. हा रूबाब तुझ्याचं नशिबी आहे...बेस्ट ऑफ लक....’ असं म्हणत तिचं एकाने कौतुक केले आहे. तर अनेकांनी प्राजक्ताला तिच्या भावी आयुष्यासाठीही शुभेच्छा दिल्या आहेत. तर आणखी एक युजरने तिच्या पोस्टवर कमेंट केली की, ‘प्राजक्ता, तुझ्या नशिबात राजकारणात प्रवेश आहे असं दिसतंय’ प्राजक्ता माळी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहते. तिने मालिका, चित्रपट आणि वेबसीरीजच्या माध्यमातून चाहत्यांचे लक्ष वेधले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ

Modi Government: मोदी सरकारच्या प्रशासकीय रचनेत मोठे बदल; राजभवनांसह PMOचं नाव बदललं

मतदान केंद्राबाहेर छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी|VIDEO

Wedding Varat Ritual: लग्नानंतर नवरा आणि नवरीची वरात का काढतात?

Sangli: पाटलांच्या समर्थकांचा राडा, मतदान केंद्राबाहेर भाजप- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची हाणामारी; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT