Manasvi Choudhary
बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोरा तिच्या फॅशन सेन्स आणि स्टाईलमुळे चांगलीच चर्चेत असते.
बॉलिवूडची हॉट अभिनेत्री मलायका अरोराचा आज आपला ५० वा वाढदिवस साजरा करत आहे.
मलायका अरोरा फक्त अभिनेत्री नाही तर मॉडेल आणि उत्तम डान्सर म्हणून देखील प्रसिद्ध आहे.
मलायका अरोराचा जन्म २३ ऑक्टोबर १९७३ मध्ये मुंबईत झाला.
मलायकाचे पहिली ते नववी पर्यंतचे शिक्षण ठाण्यातील होली क्रॉस हायस्कूलमध्ये झाले आहे.
बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री अशी ओळख असलेली मलायकाला मॉडेल किंवा अभिनेत्री व्हायचे नव्हते.
मलायका अरोराला लहानपणापासून मॉडेल किंवा अभिनेत्री नाही तर स्कूल टीचर होण्याचे स्वप्न होते.
आता ग्लॅमरस दिसणारी मलायका एकेकाळी मुलांसारखे कपडे घालायची आणि इतरांवर दादागिरी करायची.