Poet Kishor Kadam Saumitra Facebook Post Angry Reaction Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kishor Kadam Post: 'टोलच्या नावाखाली लोकांची लूट...' मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे टोलवर कवी सौमित्रची पोस्ट चर्चेत

Chetan Bodke

Poet Kishor Kadam Saumitra Facebook Post Angry Reaction

लोकप्रिय अभिनेते आणि कवी सौमित्र उर्फ किशोर कदम (Poet Kishor Kadam) यांची फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आली आहे. नुकतंच किशोर कदम यांनी फेसबुकवर मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टच्या माध्यमातून कवी सौमित्र यांनी सरकारला काही सवाल विचारले आहेत. या हायवेवर आकारल्या जाणाऱ्या टोलसंदर्भात त्यांनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत. सौमित्र यांनी शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील स्वत:ची मतं मांडली आहेत. चला तर एक नजर टाकूया कवी सौमित्र यांच्या पोस्टवर....

अभिनेते आणि कवी किशोर कदम आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, “मुंबईहून पुण्याला जातांना एक्स्प्रेस हायवे वर २४० टोल घेतात. मध्ये मनःशांती वगैर मध्ये काही खायला लोणावळ्यात उतरलं की वर हायवेवर पुन्हा आल्यावर पुन्हा २४० का घेतात? टोलच्या नावाखाली चाललेली लोकांची ही लूट थांबवण्याबद्दल कुणी बोललं का? आणि एरवीही प्रवास केल्यावर अधून मधून फास्टटॅग मधून पैसे गेल्याचे मेसेजेस तासा दोनतासांनी येत राहतात. ते पैसे कुठे आणि का जातात? अरे लूट थांबवा रे ही. लोक काहीच बोलत नाहीत म्हणून किती लुटणार आहात?कुणाकडे तक्रार करायची? याला जबाबदार अधिकारी कोण आहेत?” सध्या सौमित्र यांचीही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी किशोर यांच्या या पोस्टवर पाठिंबा देत त्यांनाही असाच अनुभव आल्याचे सांगितले आहे.

किशोर कदम यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. पोस्टवर एका नेटकऱ्याने लिहिलं की, “सगळीकडे हेच चित्र आहे. मुंबईतला ऐरोली टोल नाका कशाला आहे ते कळत नाही,तिथला रस्ता किती वर्षे झाली खराबच आहे.खड्डे आणि पुढे टोल नेमकं कशाचा टोल भरायचा खड्ड्याचा का,तेच कळत नाही. रात्री दिवे नसतात तेव्हा तर आणखी वाट लागते.”

तर आणखीएक युजर म्हणतो, “हे असे आहे कारण आपण त्यांना उत्तरदायी करत नाही. पुणे मुंबई हायवे होऊनही आता २५च्या वर वर्ष लोटली आहेत, इतकी वर्षे जगात कुठेही टोल घेत नाही. ही बेशरम लूटमार आहे आणि आपण ती सहन करत आहोत. जिथे रस्ते प्रचंड खराब आहे तिथेही उद्दाम पणे टोल घेतात. त्यावर कोणाचेही नियंत्रण आहे असे वाटत नाही”

तर आणखी एक युजर म्हणतो, “टोल फी घेत असाल तर मग नवीन गाडी घेताना वन टाईम रोड टॅक्स कशाला घेतात??”

सोबतच आणखी एक युजर कमेंटमध्ये म्हणाला की, “मागे एकदा ऋजुता देशमुखने ह्याच संदर्भात पोस्ट केली आहे आणि तिने त्याचा पाठपुरावा ही घेतला होता..”

दरम्यान, सध्या महाराष्ट्रामध्ये टोलमुळे चांगलाच वादंग निर्माण झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी नुकतंच त्यांना टोलनाक्यावर अडवल्याने मनसैनिकांनी टोलनाका फोडला होता. टोलनाक्यावर अडवणूक फक्त राजकीय मंडळींचीच नाही तर, सेलिब्रिटी आणि सामान्य माणसांची देखील होत असते. अनेकदा विनाकारण दोन वेळा टोल द्यावा लागत असल्यामुळे सर्वांच्याच खिशाला मोठा भुर्दंड बसतो. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री ऋतुजा देशमुखने हिने टोलनाक्यावर अधिक टोल कापत असल्यामुळे व्हिडीओच्या माध्यमातून तक्रार केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT