Tejaswini Pandit Movie canva
मनोरंजन बातम्या

Tejaswini Pandit Movie: "मी महाराष्ट्राचा... महाराष्ट्र माझा...", राज ठाकरेंवर तेजस्विनी पंडित बनवणार चित्रपट? 'येक नंबर'ची झलक, पाहा VIDEO

Tejaswini Pandit Production : प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वीनी पंडितचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला. इन्स्टाग्राम पोस्ट द्वारे केलं जाहीर.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'येक नंबर' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे, या चित्रपटाची निर्मिती मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वीनी पंडित (Tejaswini Pandit)करत आहे. तर याचं दिग्दर्शन राजेश मापुस्कर यांच्या खांद्यावर आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला, त्यानंतर प्रेक्षकांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. तेजस्वीनीने आपल्या इन्स्टाग्रावर (Instagram) 'येक नंबर' चित्रपटाची झलक शेअर केली आहे. त्यावरुन चर्चेला उधाण आलेय, नेटकऱ्यांकडून ना ना अंदाज वर्तवले जातेय. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपटात देवा आणि वेद या दोन तरुणांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे.

अभिनेत्री तेजस्वीनी पंडितने 'येक नंबर' या चित्रपटाच्या माध्यमातून निर्माती क्षेत्रात पाऊल टाकलेय. गेल्या काही दिवसांपासून तेजस्वीनीच्या या नव्या चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. 'येक नंबर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला १० ऑक्टोबर रोजी येणार आहे.

'येक नंबर' या चित्रपटाची निर्मिती सह्याद्री फिल्म्सकडून करण्यात आली आहे. चित्रपटाचे दिगदर्शन राजेश मापुस्कर यांनी केले आहे. त्यासोबतच चित्रपटाच्या संगीत आणि गाण्याची जबाबदारी अजय - आतुल (Ajay Atul) या जोडीवर आहे. तेजस्वीनी पंडितनं पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये "मी महाराष्ट्राचा... महाराष्ट्र माझा...!" अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तेजस्वीनीचा सेटवरील फोटो व्हायरल झाले होते, त्यामध्ये एक कलाकार राज ठाकरेंच्या स्टाईलमध्ये दिसत होता. त्यावरून राज ठाकरेंवर नवा चित्रपट येतोय की काय? या चर्चेने जोर धरला होता.

'येक नंबर' हा चित्रपट राज ठाकरेंच्या (Raj Thackrey) आयुष्यावर तर नाही ना? असा प्रश्न नेटकऱ्यांच्या आणि मराठी प्रेक्षकांना पडलाय. याबाबत अद्याप सपेन्स आहेच, पण ज्यावेली या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होईल, त्यावेळीच या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. 'येक नंबर' या चित्रपटातील स्टारकास्टबद्दल कमालीची गुप्तता बाळगण्यात आली आहे. कोण कोणत्या भूमिकेत आहे, मुख्य कलाकार कोणते असतील... मुख्य अभिनेत्री कोण असेल? यावरुन थोड्याच दिवसात पडदा उठेल.

Edited By: Nirmiti Rasal

Bahadurgad Fort History: छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला बहादूरगड, वाचा इतिहास

Skin Care Tips: दिवाळीत दिसा सुंदर! या 3 सोप्या घरगुती उपायांनी मिळवा नॅचरल ग्लो

Dhanteras Puja: धनत्रयोदशीची पूजा कशी करायची? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि साहित्य

Maharashtra Live News Update : निलेश घायवळचा जामीन रद्द करावा, पुणे पोलिसांची न्यायालयाला विनंती

Bigg Boss 19: 'तू खूप निर्लज आणि इरिटेटिंग...'; शेहबाजवर संतापला सलमान खान, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT