National Film Award Winner List : 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये वाळवी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ठ मराठी चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच सचिन सुर्यवंशी यांनी दिग्दर्शित केलेल्या 'वारसा' या चित्रपटाला सर्वोत्तम कला सांस्कृतिक चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. वाचा संपूर्ण यादी..
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा केली आहे. यामध्ये वाळवी या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान मिळवला आहे. साऊथ अभिनेता ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. 'कंतारा' या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
ऋषभ शेट्टीच्या कांतारा चित्रपटाने यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात बाजी मारली आहे. ऋषभ शेट्टी याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आले. तर कांतारा चित्रपटाला लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. यंदा बॉलिवूडच्या कोणत्याही अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला नाही. नित्या मेनन (Thiruchitrambhalam) आणि मानसी पारेख (Kutch Express) यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला.
नीना गुप्ता यांना ऊंचाई चित्रपाटासठी बेस्ट सपोर्टिंग अभिनेत्री हा पुरस्कार देण्यात आलाय. तर बेस्ट सपोर्टिंग अभिनेत्याचा पुरस्कार पवन मल्होत्रा यांना देण्यात आला.सूरज बडजात्या यांना ऊचांई चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट डायरेक्टरचा पुरस्कार मिळाला आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटासाठी अरिजीत सिंह याला सर्वोत्कृष्ट मेल प्लेबॅक सिंगर पुरस्काराने गौरवण्यात आले. यश याच्या केजीएफ २ चित्रपटाला कन्नट चित्रपाटाच पुरस्कार मिलाला आहे.
मणिरत्नम यांच्या डायरेक्शनमध्ये तयार झालेल्या पोन्नियिन सेल्वन 1 या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट तामिळ चित्रपट हा पुरस्कार देण्यात आलाय. या चित्रपटामध्ये ऐश्वर्या राय, शोभिता धुलिपाला यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. गुलमोहर चित्रपटासाठी मनोज वाजपेयी यांना पुरस्कार देण्यात आलाय. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपाटाचा पुरस्कार मनोज वाजपेयी यांच्या गुलमोहर या चित्रपटाला मिलाला आहे. सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट कांतारा आणि बेस्ट फीचर चित्रपटाचा पुरस्कार मलयालम अट्टम या चित्रपटाला देण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्यामध्ये मराठी चित्रपटांनी बाजी मारली असून साहिल वैद्य यांच्या 'मर्मर्स ऑफ द जंगल'ला बेस्ट डॉक्यु्मेंटरी आणि बेस्ट नॅरेशन असे दोन पुरस्कार मिळाले आहेत. तसेच सचिन सुर्यवंशी यांच्या वारसा चित्रपटाला बेस्ट आर्ट कल्चरल फिल्मचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर आदीगुंजन या मराठी चित्रपटाला सर्वोत्तम निवेदन पुरस्कार, सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म - अट्टम
सर्वोत्कृष्ट अभिनेता - ऋषभ शेट्टी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - नित्या मेनन आणि मानसी पारेख
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - सूरज बडजात्या
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – नीना गुप्ता
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – पवन मल्होत्रा
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म होलसम एंटरटेनमेंट - कांतारा
सर्वोत्कृष्ट पदार्पण - फौजा, प्रमोद कुमार
सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट - सौदी वेलाक्का
सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट - PS1
सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट - KGF2
सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट - कार्तिकेय २
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - गुलमोहर
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - गुलमोहर
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - वाळवी
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी -Mumars of the Jungle
दिग्दर्शक आणि प्रोड्युसर - साहिल वैद्य
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.