Tejaswini Pandit Post For Jyoti Chandekar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jyoti Chandekar: माझ्या डोक्यावरचं छप्पर हरपलं…; आईच्या जन्मदिनी तेजस्विनीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

Tejaswini Pandit Post For Jyoti Chandekar: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाला अवघे काही दिवस झाले आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुलगी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने एक पोस्ट शेअर केली.

Shruti Vilas Kadam

Tejaswini Pandit Post For Jyoti Chandekar: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाला अवघे काही दिवस झाले असताना, आज त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांची मुलगी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. आईच्या अचानक झालेल्या निधनामुळे तिच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी शब्दांत मांडताना ती फारच व्यथित झाली आहे.

आईसाठी पोस्ट करत तेजस्विनीने लिहीलं, आई, काय बोलू…अजून sink in होत नाहीये गं तू नाहीस. आपली International Girls Trip राहिली, कथा चा पहिला वाढदिवस जोरदार करणार होतो आपण, आपल्या फार्म वर new year celebrate करायचा होता. तुझ्यावरचं पुस्तक प्रकाशन आज तुझ्या वाढदिवसाला करायचं होतं आपल्याला, त्याचं किती काम बाकी राहून गेलं.

तेजस्विनी पुढे लिहीते, आई तू ना प्रचंड हट्टी होतीस . किती वर्ष तुला सांगते होते आधी स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष दे. पण काम सोडून काहीच सुचलं नाही तुला. मला नेहमी म्हणायचीस काम करता करता मरण यावं. कित्येकदा तुला सांगितलं तुझ्या मुली खमक्या आहेत. तू आता फक्त तुझ्या आनंदासाठी काम कर. तुझ्या terms वर. पण कामाप्रती तुझी श्रद्धा काही औरच होती. आणि बरोबरच आहे, कामात स्वतःचा आनंद असणारी,मानणारी माणसं आजच्या पिढीत क्वोचितच सापडतात. खूप निग्रही, निष्ठावंत, मेहनती होतीस तू आई. खूप धावपळ, खूप काम केलंस. खूप खस्ता खात, कष्ट करत आम्हाला वाढवलंस. कधीच त्या कष्टाची तक्रार केली नाहिस. पण वयानुसार मन मोठं होत असलं तरी शरीर थकतं हेही समजून घायला हवं होतंस ना गं आई! का ग अंगावर काढलंस सगळं? पत्ताच लागू दिला नाहीस काहीच. ३ दिवसात होत्याचं नव्हतं झालं ! माझ्या डोक्यावरचं छप्पर हरवलं आई…बाबा हाक मारता येत नव्हती आता आई हाक मारली तर ओ द्यायला कुणीच नसेल का गं ?

आई तू कलाकार म्हणून भन्नाटच होतीस, आहेस आणि राहशील. तुझ्या भारदस्त आवाजाने आणि पाणीदार डोळ्यांनी तू प्रेक्षकांना कायम भारावून टाकायचीस…कलाकार हा नेहमीच त्याच्या कलाकृतीतून जिवंत राहतो. त्यामुळे तू आहेसच , असशीलच. तुझ्यावरचं प्रेक्षकांचं प्रेम बघून खूप कौतुक वाटायचंच, ह्यावेळेला मात्र अभिमानाने ऊर भरून आला. तुझ्यासारख्या कलाकाराच्या पोटी मी जन्माला आले ह्यापेक्षा मोठं भाग्य ते काय, असे पुढे तेजस्विनी म्हणाली.

आणि माझी काळजी करू नकोस. तू स्वतः आयटीत जगलीस, त्यामुळे मला जसं वाढवलं आहेस तशीच मी जगेन. रूबाबात. fearless. जिंदादिल. आणि दीदी आणि कथा ची काळजी घेईन. तुझ्या अर्धवट राहिलेल्या इच्छा आम्ही दोघी मिळून पूर्ण करू ! तुझ्यावरचं पुस्तक मी पूर्ण करेन आणि तुझा प्रेरणादायी प्रवास त्या पुस्तकरूपी वाचकांसमोर/ प्रेक्षकांसमोर आणेन.
आता तरी तू आराम कर. तुझा पुढचा प्रवास ज्योतीर्मय, शांतीने आणि आनंदात होऊदेत.
बाबावर करायचं राहिलेलं सगळं प्रेम करून घे. तुम्हाला आता कुणी वेगळं करू शकत नाही. बाबाला माझ्याकडून पप्पी दे. आणि दोघेही आमच्यावर लक्ष ठेवा आणि आशीर्वाद देत रहा बस, असे तीने शेवटी लिहीले.

ज्योती चांदेकर या मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वपूर्ण नाव होतं. त्यांनी मालिकांपासून ते चित्रपटांपर्यंत अनेक गाजलेल्या भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या निधनानंतर मराठी कलाविश्वात शोककळा पसरली होती. आईच्या वाढदिवशी शेअर केलेल्या तेजस्विनीच्या या पोस्टमुळे चाहत्यांसह कलाकारांच्याही डोळ्यांतही पाणी आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Bigg Boss 19'च्या घरामध्ये राडा; 5 सदस्य नॉमिनेट, कुणाचा पत्ता कट होणार?

Satara Gazetteer: मराठा आरक्षणात सातारा गॅझेटियरचं महत्त्व काय? पाहा सविस्तर | VIDEO

Maharashtra Live News Update: सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 170 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा

Viral Video: क्रूरता! कुत्रा भुंकला म्हणून दुचाकीला बांधलं अन् गावभर फरफटत नेलं, नाशिकमधील व्हिडीओ व्हायरल

Mumbai-Konkan Ro Ro Ferry: आनंदाची बातमी! मुंबई-कोकण प्रवास केवळ ५ तासांत होणार, सागरी रो-रो चाचणी यशस्वी

SCROLL FOR NEXT