Devmanus SAAM TV
मनोरंजन बातम्या

Devmanus : 'देवमाणूस' मधील महेश मांजरेकर यांचा लूक पाहिलात का? चित्रपटासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Devmanus Star Cast First Look : 'देवमाणूस' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटातील कलाकारांचा फस्ट लूक समोर आला आहे.

Shreya Maskar

तेजस देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित मल्टीस्टार मराठी चित्रपट 'देवमाणूस' ची (Devmanus) प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतेच या चित्रपटात असलेल्या कलाकारांचे पोस्टर्स लाँच करण्यात आलेत. महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) , रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके असे दिग्गज कलाकार आहेत. पोस्टरमधून चाहत्यांना सिनेमात असलेल्या त्यांच्या प्रभावशाली स्वरूपाची एक झलक देतात.

चित्रपटाचे चाहते टीझरची खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. रिलीझ झालेल्या ह्या पोस्टर्स मध्ये आपण चित्रपटाच्या मुख्य पात्रांचे अतिशय मोहक फर्स्ट लूक पाहू शकतो. अभिनेते महेश मांजरेकर ह्यांचा खूपच साधा पण इंटेन्स लूक आपल्याला दिसून येतो. त्यांची भेदक नजर त्यांच्या या भूमिकेची गंभीरता सांगते. अभिनेत्री रेणुका शहाणे ह्यांचा मायाळू, सरळ देखावा आणि मनमोहक लूक लक्ष वेधून घेणारा आहे. तर सुबोध भावे ह्यांना पोलिसांच्या हटके भूमिकेत पाहू शकतो.

'देवमाणूस' चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ बोडके त्याच्या हसण्याने सिनेमाचं आणि त्याच्या भूमिकेचे रहस्य वाढवतो. लव फिल्म्स प्रस्तुत, 'देवमाणूस' या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर ह्यांनी केले आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित आहे. 'देवमाणूस' चित्रपट 25 एप्रिल 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT