Tejas Film Declared Release Date Instagram
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut Video: पंगा गर्लच्या ‘तेजस’ने दुसऱ्या दिवशी केली केवळ इतकी कमाई, अभिनेत्रीने व्हिडीओतून केलं चाहत्यांना चित्रपट पाहण्याचं आवाहन...

Kangana Ranaut Tejas Film: चित्रपटाला प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे एका व्हिडीओच्या माध्यमातून कंगनाने प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.

Chetan Bodke

Tejas 2nd Day Box Office Collection

सध्या बॉक्स ऑफिसवर कंगना रनौतच्या ‘तेजस’ची जोरदार चर्चा होत आहे. २७ ऑक्टोबरला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून चित्रपटाला प्रेक्षकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. सोशल मीडियावर जरी चित्रपटाची चर्चा होत असली तरी, चित्रपटाला पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशीही खास प्रतिसाद मिळालेला नाही. चला तर जाणून घेऊया, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी कशी कमाई केली आहे.

सर्वेश मेवाडा दिग्दर्शित ‘तेजस’ २७ ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. कंगनाने चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले असून पहिल्या दिवशी चित्रपटाने फक्त १.२५ कोटींचा टप्पा गाठला आहे. तर दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १.२५ कोटींचीच कमाई केली आहे.

चित्रपटाने फक्त दोन दिवसात २.५० कोटींचा आकडा गाठला आहे. चित्रपटाच्या कमाईचा आकडा सॅकल्निक या ट्रेड ॲनालिस्टने एक संभाव्य आकडा चाहत्यांसोबत शेअर केला आहे. चित्रपटाने फारच निराशाजनक ओपनिंग केल्यामुळे चित्रपटाच्या टीमला नेटकरी प्रचंड ट्रोल करीत आहे. (Trolled)

प्रेक्षकांनी कंगनाच्या या चित्रपटाकडे पाठ फिरवली असली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे एका व्हिडीओच्या माध्यमातून कंगनाने प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. कंगनाने स्वत: तो व्हिडीओ शेअर केला असून, त्यामध्ये ती म्हणाली, “नुकतंच थिएटरमध्ये ‘तेजस’ चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट पाहिल्यानंतर आम्हाला सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. कोव्हिडनंतर बॉलिवूड इंडस्ट्री पूर्णपणे सावरलेली नाही. मी मल्टिप्लेक्सच्या प्रेक्षकांना विनंती करते की, जर तुम्ही उरी, नीरजा, मेरी कॉम या सारखे चित्रपट पाहिले असतील तर, ‘तेजस’चित्रपटही तुम्हाला आवडेल.” (Bollywood Film)

सर्वेश मेवाडा दिग्दर्शित आणि लिखित चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत कंगना व्यतिरिक्त अंशुल चौहान, वरुण मित्रा, पंकज त्रिपाठी आणि आशिष विद्यार्थी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. जबरदस्त ॲक्शन चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांनी केली आहे. चित्रपटामध्ये कंगना आणि वरुण मित्रा यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे. चित्रपटाची कथा पाहता चित्रपट चांगली कमाई करेल, अशी अपेक्षा होती. पण तसं काहीच घडलं नाही. चित्रपटाला भारतामध्ये तब्बल १३०० स्क्रीन्स उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्या तरी चित्रपटाने खूप वाईट ओपनिंग केली आहे.

चित्रपट कामगिरीच्या बाबतीत फारच अपयशी ठरला आहे. चित्रपटाच्या कमाईचा आलेख जर असाच कायम राहिला तर, हा सलग तिसरा फ्लॉप चित्रपट ठरू शकतो. या आधी कंगनाचा ‘चंद्रमुखी २’ आणि ‘धाकड’ हे दोन्ही चित्रपट फ्लॉप ठरले होते. लवकरच कंगानाचा ‘इमरजेन्सी’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तिने चित्रपटामध्ये स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं पात्र साकारलं आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची आणि निर्मितीची धुरा तिने स्वत: सांभाळलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट

Nagpur University : शिक्षणाच्या आयचा घो! परीक्षेत पैकीच्या पैकी गुण तरीही गुणपत्रिकेत 'नापास'; नागपूरातील ढोबळ कारभार

KBC 17: कौन बनेगा करोडपती सीझन १७चा पहिला करोडपती; ७ कोटींच्या कोणत्या प्रश्नाचे दिले उत्तर?

First Metro: जगातील पहिली मेट्रो कधी आणि कुठे सुरू झाली? जाणून घ्या रंजक इतिहास

जुना वाद जिवावर उठला! ५ जणांनी अल्पवयीन मुलाच्या अंगावर टेम्पो घातला; रस्त्यावर चिरडून मारलं

SCROLL FOR NEXT