TDM Marathi Movie Bakula Song  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bakula Song: मनाला चटका लावणाऱ्या 'टीडीएम' चित्रपटातील 'बकुळा' गाणे घेणार प्रेक्षकांच्या मनाचा ठाव

'बकुळा' या गाण्यात लग्नातील धमाल-मस्ती सोबतच नववधूच्या मनातील हुरहुर, जोडीदाराची ओढ, लग्नाचा माहोल, पाहुण्यांची लगबग आणि आई, वडील आणि भावाच्या मनातील घुटमळ याचे उत्तम वर्णन या गाण्यातून व्यक्त करण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bakula Song: लग्नसराई म्हटलं की गाण्यांशिवाय शोभा येतच नाही. लगीन गाण्यांचा पॅटर्न हा हळदीचा, वरातीच्या गाण्यांचा असला तरी माहेरहुन सासरी जाणाऱ्या मुलीसाठी आई, वडील, बहीण, भाऊ यांची होणारी घुटमळ प्रेक्षकांचा दिलाचा ठोका चुकवायला 'टीडीएम' चित्रपटातील 'बकुळा' या गाण्यातून समोर आली आहे.

'बकुळा' या गाण्यात लग्नातील धमाल-मस्ती सोबतच नववधूच्या मनातील हुरहुर, जोडीदाराची ओढ तसेच लग्नाचा माहोल, पाहुण्यांची लगबग आणि आई, वडील आणि भावाच्या मनातील घुटमळ याचे उत्तम वर्णन या गाण्यातून व्यक्त करण्यात आले आहे. डॉ. विनायक पवार यांनी लिहिलेल्या या गीताला नंदेश उमप, प्रियांका बर्वे आणि ओंकारस्वरूप बागडे यांनी आपल्या मधुर स्वरांनी चारचाँद लावले आहेत. तर हे गाणे ओंकारस्वरूप बागडे आणि वैभव शिरोळे यांनी संगीतबद्ध केले आहे.

'बकुळा' या गाणयातून अलवार नाते गोंजारले जात असून नंदेश उमप यांनी अगदी जीव ओतून हे गाणे स्वरबद्ध केले आहे यांत शंकाच नाही. हृदयस्पर्शी असे या गीताचे बोल सर्वसामान्य माणसांच्या मनाला चटका लावून जाणारे आहे. आता लग्नसराईचे दिवस सुरु झाले असून 'बकुळा' या गाण्याला नक्कीच भरभरून प्रतिसाद मिळेल यांत शंका नाही.

'चित्राक्ष फिल्म्स' आणि स्माईल स्टोन स्टुडिओ' प्रस्तुत 'टीडीएम' या आशयघन चित्रपटाच्या निर्मितीची धुरा दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी पेलवली असून चित्रपटाची कथा, संवाद, स्क्रीनप्लेची जबाबदारी बी. देवकाते आणि भाऊरावांनी सांभाळली आहे. या चित्रपटाच्या संगीताची बाजू वैभव शिरोळे आणि ओंकारस्वरूप बागडे यांनी पाहिली. ३ फेब्रुवारी २०२३ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Phaltan Doctor Death Case : फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी बातमी! गोपाळ बदनेचं आत्मसमर्पण, तपासाला वेग

Annual Prepaid Offer: वर्षभरासाठी करा फक्त एकदाच रिचार्ज अन् मिळवा कॉलिंग, डेटा, एसएमएसची सुविधा

Ahilyanagar News: सीएनजी पंपावर कर्मचाऱ्यांची मुजोरी; वाहनात गॅस भरण्यावरून दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Politics: महायुतीतील कुरघोडीमुळे शिंदे नाराज? शिंदे पुन्हा दिल्ली दरबारी

Bihar Election : निवडणुकीआधीच मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; सत्ताधारी पक्षाने माजी मंत्र्यांसहित ११ आमदारांना केलं निलंबित

SCROLL FOR NEXT