Pushpa Impossible SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bhavya Gandhi : तारक मेहतामधील टप्पू आता व्हिलन होणार, सायकोच्या भूमिकेत गाजवणार छोटा पडदा!

Pushpa Impossible : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम टप्पू म्हणजेच भव्य गांधी आता नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची भूमिका जाणून घ्या.

Shreya Maskar

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा लोकप्रिय शो अजूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आहे. या शो मधील टप्पू हे पात्र लोकांना खूप आवडते. लहानपणी नटखट दाखवलेला टप्पू आता मोठा झाला आहे. लहानपणीच्या मस्तीखोर टप्पूची भूमिका भव्य गांधी (Bhavya Gandhi) यांनी साकारली होती. यामुळे त्याला खूप लोकप्रियताही मिळाली. मात्र भव्य गांधीने खूप आधी हा शो सोडला. त्यानंतर त्यांनी स्वतःचे नवे करिअर सुरू केले. त्यांने अनेक गाण्यात तसचे चित्रपटात काम केले आहे. आता पुन्हा एकदा भव्य गांधी एका नव्या रुपात दिसणार आहे.

'पुष्पा इम्पॉसिबल' (Pushpa Impossible) या लोकप्रिय शो मध्ये भव्य गांधी झळकणार आहे. या शोमध्ये तो निगेटिव्ह भूमिकेत दिसत आहे. या शोमध्ये पुष्पाचा प्रवास दाखवण्यात आला आहे आणि आता भव्य गांधी यात तुफान घेऊन येणार आहे. 'पुष्पा इम्पॉसिबल' मधील भव्य गांधीच्या पात्राचे नाव 'प्रभास' आहे. तो या शोमध्ये मानसिकदृष्ट्या आजारी खलनाय दाखवला आहे. त्याच्या मनात सूडाची भावना आहे.

'पुष्पा इम्पॉसिबल' शोचा प्रोमोमध्ये भव्य गांधी खतरनाक लूकमध्ये दिसत आहे. या व्हिडिओ नेटकऱ्यांच्या अनेक कमेंट्स येत आहेत. 'प्रभास'ची भूमिकेतून पहिल्यांदाच अशी वेगळी भूमिका भव्य गांधी साकारणार आहे. ही आव्हानात्मक भव्य गांधी कसा साकारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रभासच्या मानसिकतेमुळे या शोमध्ये नवीन ट्विस्ट येणार आहे. या शोच्या माध्यमातून भव्य गांधी ५ वर्षांनी टिव्हीवर पदार्पण करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samruddhi Kelkar: परी म्हणू की सुंदरा! समृद्धीच्या घायाळ अदा पाहून व्हाल फिदा

Maharashtra Live News Update: सतीश भोसले उर्फ खोक्याला जामीन मंजूर

WhatsApp Ticketing : खुशखबर! मुंबई लोकल ट्रेनचं तिकीट Whatsappवर, जाणून घ्या बुकींग स्टेप्स

Manoj Jarange Patil : फडणवीस मराठा नेत्यांना संपविण्याच्या तयारीत, भाजप आमदार- खासदारांचे फोन; मनोज जरांगे पाटील यांचा धक्कादायक दावा

New Marathi Serial : 'स्टार प्रवाह'वर येतेय नवीकोरी मालिका; लोकप्रिय अभिनेता खलनायकाच्या भूमिकेत, सिरीयलचे नाव काय?

SCROLL FOR NEXT