palak sindhwani saam tv
मनोरंजन बातम्या

tarak mehta fame palak sindhwani : अभिनेत्री पलक सिधवानीचं प्रोडक्शन हाऊसविरुद्ध बंड ?

तारक मेहतामधली सोनु भिडे आता नाही दिसणार : मालिकेत काम करणार नाही ?

Sneha Dhavale

छोट्या पदद्याची बातच न्यारी. छोट्या पडद्यावरील अनेक कार्यक्रम प्रक्षेकांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यातही अगदी सिरियस फॅमिली ड्रामापासून ते ऑफबीट कथानक असलेल्या मालिकांपर्यंत सगळ्यालाच प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली आहे. या छोट्या पडद्यानं इंडस्ट्रीला अनेक कलाकारही दिले. अनेकाचं अभिनयात करिअर घडवलं आहे.

छोट्या पडद्यावरची 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही विनोदी मालिका ही त्यापैकीच एक. अनेक वर्षांनंतरही 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ची जादु कायम आहे. या मालिकेची आणि तिच्या कलाकारांची लोकप्रियता तसुभरही कमी झाली नाही. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये मराठमोळ्या भिडे दाम्पत्याच्या मुलीची म्हणजेच सोनु भिडेची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री पलक सिधवानी घराघरात पोहचलेली आहे. पण आता अभिनेत्री पलक सिधवानी आपल्याला मालिकेत यापुढे असणार नाही असं दिसत आहे.

अभिनेत्री पलक सिधवानीने या मालिकेचं प्रोडक्शन हाउस 'नीला फिल्म प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड'शी केलेला करार मोडला आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'या मालिकेतले कलाकार आणि प्रोडक्शन हाउसचे मालक असित मोदी यांच्यात काही कारणांवरुन वाद असल्याचं समजतंय. अभिनेत्री पलक सिधवानीने प्रोडक्शन हाउसचे मालक असित मोदी यांच्यासोबतच्या वादामुळे मालिकेत काम करण्याला नकार दिला आहे, अशी चर्चा आहे. पण पलकला जेव्हा या वादांविषयी विचारण्यात आलं तेव्हा तिनं या बातम्या निरर्थक असल्याचं सांगितलंय. आता खरंखोटं काय ते लवकरच कळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

SCROLL FOR NEXT