Tanushree Dutta On Nana Patekar And Vivek Agnihotri Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tanushree Dutta On Nana Patekar And Vivek Agnihotri: तनुश्री दत्ताचा नाना पाटेकरांवर पुन्हा गंभीर आरोप, विवेक अग्निहोत्रींनाही धरलं धारेवर

Tanushree Dutta News: नुकतंच तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्याविषयी भाष्य केलं आहे.

Chetan Bodke

Tanushree Dutta On Nana Patekar And Vivek Agnihotri

सध्या बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता प्रचंड चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत राहिलेल्या आदिल खान आणि राखी सावंत प्रकरणात तनुश्रीनेही उडी घेतली आहे. त्यामुळे तनुश्री कमालीची चर्चेत आहे. नुकतंच तनुश्रीने आदिल खानसोबत पत्रकार घेतली होती. यावेळी पत्रकार परिषदेत तिने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्याविषयी भाष्य केलं आहे. सध्या सर्वत्र तनुश्री दत्ताने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

तनुश्रीने २०१८ मध्ये नाना पाटेकर यांच्या विरोधात शारीरिक शोषणाचा आरोप लावला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने केलेल्या वक्तव्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. पुन्हा एकदा तनुश्रीने नाना पाटेकरांविषयी काही भाष्य केलं आहे. नाना पाटेकर आणि विवेक अग्निहोत्रींसारख्या लोकांमुळे तिचं करियर बिघडल्याचं तनुश्री मुलाखतीत म्हणाली होती.

अभिनेत्री मुलाखत म्हणाली, “ज्या लोकांनी तिचे करियर संपवले. ते आजही इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळत आहेत. आता तर नाना पाटेकर विवेक अग्निहोत्रींच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.” यावर तनुश्रीने नाना पाटेकर यांचे नाव घेत त्यांची स्थिती तेव्हीही नव्हती आणि आज सुद्धा नाहीये, असं देखील ती म्हणाली.

पुढे तनुश्री दत्त म्हणाली, “नाना पाटेकर आणि विवेक अग्निहोत्रीसारखे लोकं Irrelevant आहेत. आपण तश्या लोकांबद्दल का बोलावे? त्यांच्याबद्दल बोलून मला प्रसिद्धी द्यायची नाही. आजही त्यांना त्यांचे चित्रपट चालवण्यासाठी माझ्या नावाचा वापर करावा लागतो. २००८ मध्ये माझे आणि नानांचे भांडण झाले होते. त्यावेळी त्यांचा बॉक्स ऑफिसवर चित्रपट फ्लॉप ठरला होता. जेव्हा त्यांचे चित्रपट हिट होत नाहीत, तेव्हा ते माझ्यासारख्या लोकांना अप्रोच करतात. चित्रपटामधील एखादे गाणं गाणे किंवा त्यांच्या चित्रपटामध्ये मी कॅमिओ करावं, त्यासाठी ते माझ्याकडे येतात..”

तनुश्री दत्त सध्या अभिनय क्षेत्रापासून दुर असून ती अखेरची २०१० मध्ये चित्रपटामध्ये दिसली होती. जरीही अभिनेत्री सिनेसृष्टीपासून दुर असली तरी सुद्धा, ती कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांची संख्या देखील चांगल्या प्रमाणात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer: कॅन्सरची ही लक्षणं शरीरात लपलेली असतात

Curly Hair Care: कुरळ्या केसांसाठी कधीच वापरू नका या ७ गोष्टी, नाहीतर तुमचे केसं कायमचे होतील कोरडे आणि निर्जीव

Cyclone Alert! धोक्याचा इशारा! २४ तासात चक्रीवादळ धडकणार, IMD चा नवा अलर्ट काय?

Maharashtra Dasara Melava Live Update: ज्यांचे शेतं आणि पिक वाहून गेलं 1 लाख 30 हजार रुपये भरपाई द्यायची- मनोज जरांगे

Pune IT Jobs : टाटांच्या कंपनीत नोकरकपात, पुण्यातील २५०० कर्मचाऱ्यांना राजीनामा द्यायला लावला, कुटुंबाच्या अडचणी वाढल्या

SCROLL FOR NEXT