Tamil TV actress Subashini passes away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actress Death: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचं निधन; कौटुंबिक वादामुळे संपवलं आयुष्य, मनोरंजन विश्वात खळबळ

Actress Death: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचे राहत्या घरी निधन झाल्याची धक्कदायक घटना घडली आहे. तिच्या जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.

Shruti Vilas Kadam

Actress Death: तमिळ टेलिव्हिजन इंडस्ट्रीला आज मोठा धक्का बसला आहे. लोकप्रिय अभिनेत्री सुभाषिनी हिने चेन्नईतील तिच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे चाहत्यांसह संपूर्ण मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुभाषिनी ही चेन्नईतील आय्यप्पंथंगल परिसरातील अपार्टमेंटमध्ये राहत होती. रविवारी रात्री तिचा मृतदेह घरात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

सुभाषिनी ही मूळची श्रीलंकेची रहिवासी होती आणि तमिळ मनोरंजन क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी ती चेन्नईत स्थायिक झाली होती. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले असून ‘कायल’ या लोकप्रिय मालिकेमुळे तिला विशेष ओळख मिळाली. तिच्या अभिनयामुळे तिने प्रेक्षकांच्या मनात घर केले.

दरम्यान, काही वृत्तांनुसार आत्महत्येपूर्वी तिचा पतीसोबत व्हिडिओ कॉलवर वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. या वैयक्तिक वादामुळे मानसिक ताण निर्माण झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

१२ एप्रिल रोजी तिचा वाढदिवस होता. तर, २१ एप्रिल रोजी तिच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस होता. सुभाषिणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय होती. इन्स्टाग्रामवर तिचे ४ लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. सुभाषिनीच्या निधनानंतर सोशल मीडियावर शोक व्यक्त केला जात असून तिचे सहकलाकार आणि चाहते भावनिक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अनेकांनी तिच्या अभिनयाची आठवण काढत श्रद्धांजली अर्पण केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

मूड खराब झाल्यास मिळणार सुट्टी; भारतातही पॉलिसी राबवणार, उद्योगपतींचे संकेत

जरांगे प्रवास करत असलेल्या डिफेंडरवरून वाद; महागड्या गाडीतून जरांगेंचा आरक्षण दौरा

सरकारी-खासगी शाळा दिपकेंच्या रडारवर ; CJPचं शाळा सुधार आंदोलन

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT