Vijay Saam Tv
मनोरंजन बातम्या

Thalapathy Vijay Varisu Fees: विजयने 'या' चित्रपटासाठी घेतले घसघशीत मानधन, फी ऐकूण व्हाल थक्क

दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता थलपथी विजयचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'वारीसू' पोंगल सणाच्या दिवशी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Chetan Bodke

Thalapathy Vijay Varisu Fees: दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता थलपथी विजयचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'वारीसू' पोंगल सणाच्या दिवशी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. विजयचे चाहते बर्‍याच दिवसांपासून चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची आतुरतेने वाट पाहत होते. थलपथी हा दक्षिण चित्रपट उद्योगातील लोकप्रिय आणि नावाजलेला अभिनेता आहे. त्याचे चित्रपट असले की, हमखास हिट होतातच, असे मत निर्मात्यांसह दिग्दर्शकांचे मत आहे.

विजयचे चित्रपट थिएटरमध्ये पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्याची लोकप्रियता पाहता, चाहत्यांची संख्या पाहता विजय निर्मात्यांकडून 'वारीसू'या दाक्षिणात्य चित्रपटासाठी भरमसाठ फी ची मागणी करीत आहे. तमिळ सुपरस्टार थलपथी विजय चित्रपटाच्या बजेटपैकी पन्नास टक्के रक्कम 'वारीसु'चित्रपटासाठी फी म्हणून घेत आहे.

'वारीसू'चे एकूण बजेट 250 कोटी रुपये इतके असून विजय या चित्रपटासाठी 125 कोटी रुपये घेत असल्याची माहिती मिळत आहे. 'वारीसू' हा दिल राजू निर्मित आणि बिग बजेट चित्रपट बनवण्यासाठी ओळखल्या जाणार्‍या वामसी पैडिपल्ली यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे.

'वारीसु' हा चित्रपट तामिळ, तेलुगू आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे तेलुगू व्हर्जन बॉक्स ऑफिसवर चिरंजीवीच्या 'वॉल्टेयर वीरैया' आणि नंदामुरी बालकृष्णाच्या 'वीरा सिम्हा रेड्डी' या दोन मोठ्या स्टार चित्रपटांशी नक्कीच टक्कर देणार आहे.

थलपथी विजय आणि रश्मिका मंदान्ना या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. या दोन अभिनेत्यांशिवाय प्रकाश राज, प्रभू, सरथकुमार, शाम, खुशबू, संगीता, योगी बाबू आणि संयुक्ता या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

भूषण कुमार, दिल राजू आणि मनीष शाह यांनी 'वारीसू'च्या हिंदी आवृत्ती करणार आहे. या चित्रपटाचे डबिंग राइट्स मनीष शाह यांच्याकडे आहेत. थलपथी विजयचा 'वारीसु' हा चित्रपट पुढील वर्षी १२ जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert: पुढचे २४ तास महत्त्वाचे! मुंबई, ठाणे, रायगडला रेड अलर्ट; गरज असेल तरच बाहेर पडा

School Holiday Today: पावसाची जोरदार बॅटिंग; मुंबई, ठाण्यासह 'या' ठिकाणी शाळांना सुट्टी; वाचा सविस्तर

Horoscope: घरात येईल सुख-समृद्धि; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल लाभकारी, जाणून घ्या राशीभविष्य

Rajyog 2025: गजकेसरी आणि कलात्मक राजयोगामुळे फळफळणार 'या' राशींचं नशीब; उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

SCROLL FOR NEXT