Vijay Thalapathy 
मनोरंजन बातम्या

Vijay Thalapathy: विजय थलपती ते खुशबू सुंदर; २०२६ च्या तामिळनाडू निवडणुकांमध्ये कोणत्या 'पॉवर स्टार'च्या पक्षाची येणार सत्ता?

Vijay Thalapathy: तमिळनाडू विधानसभा निवडणूक 2026 मध्ये अनेक मोठे चित्रपट कलाकार राजकारणात उतरले असून विजय थलपती, खुशबू सुंदर यांच्यासह स्टार्सची जोरदार चुरस पाहायला मिळते. यामध्ये कोण बाजी मारेल सत्ता कोणाची असेल हे लवकरच कळेल.

Shruti Vilas Kadam

Vijay Thalapathy: तमिळनाडू विधानसभा निवडणूक 2026 मध्ये यंदा राजकारणासोबतच सिनेसृष्टीचा जबरदस्त प्रभाव पाहायला मिळत आहे. अनेक प्रसिद्ध चित्रपट कलाकारांनी या निवडणुकीत थेट राजकीय मैदानात उतरून वातावरण अधिक रंगतदार केले आहे. सुपरस्टार विजय थलपतीपासून ते खुशबू सुंदर, गौतमी, आर. सरथकुमार आणि उदयनिधी स्टालिन यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी आपले राजकीय नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे विजय थलपती. त्यांनी 2024 मध्ये ‘तमिळगा वेत्री कळगम’ (TVK) हा पक्ष स्थापन करून थेट 2026 च्या निवडणुकीत उडी घेतली आहे. विशेष म्हणजे त्यांनी ही निवडणूक कोणत्याही आघाडीशिवाय स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी चुरस निर्माण झाली आहे.

दुसरीकडे, प्रसिद्ध अभिनेत्री खुशबू सुंदर या भाजपच्या नेत्या म्हणून निवडणुकीत सक्रिय आहेत. अभिनयासोबतच त्यांनी राजकारणातही स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्याचप्रमाणे अभिनेत्री गौतमी AIADMKच्या तिकिटावर निवडणूक लढवली आहेत, तर आर. सरथकुमार एनडीएच्या प्रचारात सहभागी झाले आहेत.

मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्यासह त्यांचा मुलगा उदयनिधी स्टालिन हेदेखील या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. उदयनिधी यांनी चित्रपटसृष्टीतून राजकारणात येत युवा मतदारांना आपल्या बाजूने करण्यावर भर दिला आहे.

तमिळनाडूच्या राजकारणात चित्रपट कलाकारांचा प्रभाव नवीन नाही. यापूर्वी एमजीआर आणि जयललिता यांसारख्या सुपरस्टार्सनी राज्याचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे या निवडणुकीतही सिनेस्टार्सची एन्ट्री राज्याच्या राजकीय समीकरणात मोठा बदल घडवू शकते. आता या कलाकारांचे राजकीय भवितव्य कसे असेल कोणी विजयी होईल आणि कोणाचा पराभव हे आज म्हणजेच ४ मे रोजी कळेलच.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virar Local : विरारमध्ये प्रवाशांचा रेल रोको! एसी लोकल विरोधात संताप, प्रवाशांचं नेमकं म्हणणं काय?

Election Result Live : पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि TMC चे कार्यकर्ते आमनेसामने

Baramati rahuri bypolls election results: 12 व्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डिले 50 हजार 273 मतांनी आघाडीवर

Kolhapur crime : कोल्हापुरात घरात घुसून डॉक्टर महिलेवर बलात्कार; व्हिडीओ काढला अन्...

Thalapathy vijay Party: थलापती विजय यांच्या पक्षाचं नाव काय?

SCROLL FOR NEXT