Tamannaah Bhatia Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाची ईडी चौकशी; नेमकं काय आहे प्रकरण?

Tamannaah Bhatia: बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया अडचणीत आली आहे. तमन्ना भाटियाची ईडीकडून चौकशी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Manasvi Choudhary

बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया अडचणीत आली आहे. तमन्ना भाटियाची ईडीकडून चौकशी झाल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी तमन्नाला ईडीने समन्स पाठवलं होतं. यानंतर आता तिची चौकशी करण्यात आली असून तमन्ना ईडी कार्यालयात हजर झाली आहे.

तमन्ना भाटिया महादेव बेटिंग अॅपसंबंधित अडचणीत आली. फेअरप्ले नावाचं अॅपच प्रमोशन केल्याचा तिच्यावर आरोप आहे. या अॅपवर ,ऑनलाईन पत्ते,क्रिकेट, बॅडमिंटन, कार्ड गेम्स, फुटबॉल यांची बेटिंग करता येते. दरम्यान या अॅपचं प्रमोशन केल्याने तमन्ना मोठ्या अडचणीत आली आहे. तमन्नाची ईडीकडून चौकशी सुरू आहे. गुवाहाटी येथील ईडी कार्यालयात तमन्ना आईसह पोहचली आहे.

FairPlay हे एक बेटिंग अॅप आहे. त्यात अनेक प्रकारचे गेम्स आहेत. ऑनलाईन गेममध्ये अनेक लोक पैशांची गुंतवणूक करतात. महादेव बेटिंग अॅप प्रकरणात आत्तापर्यंत रणबीर कपूर, श्रद्धा कपूर यांनाही समन्स पाठवण्यात आले आहे. तसंच या प्रकरणात गेल्या वर्षी कपिल शर्माचीही चौकशी झाली होती. या सगळ्यानंतर आता तमन्ना भाटियाच्या अडचणी वाढल्या आहेत. ईडीने आत्तापर्यंत एकूण ४९० कोटींहून अधिक मालमत्ता जप्त केल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update:यवतमाळ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल

Uddhav Thackeray: निवडणुकांमध्ये पैशाचा पाऊस आणि सत्तेचा माज; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

Mega block News : रेल्वे प्रवाशांनो, रविवारी वेळापत्रक बघूनच बाहेर पडा; मध्य-हार्बर, ट्रान्सहार्बरवर कसं असेल नियोजन, वाचा

Amsul Sar Recipe: सर्दी खोकल्यानं हैराण झालात? मग आमसूलाचा वाटीभर सार एकचा टेस्ट करून पाहाच

Health Tips: झोपण्यापूर्वी पाय धुण्याचे आश्चर्यकारक फायदे काय?

SCROLL FOR NEXT