Lust Stories 2 Review Instagram
मनोरंजन बातम्या

Lust Stories 2 Review : लस्ट स्टोरीज 2 पाहण्याआधी या कथा वाचा, मगच चित्रपट बघा

Netflix Movie : लस्ट स्टोरीज 2 मध्ये ४ कथा आहेत

Pooja Dange

Lust Stories 2 Movie : लस्ट स्टोरीज सीजन 1 ने ओटीटी धुमाकूळ घातला होता. बोल्ड कंटेंट आणि बोल्ड थिंकिंग यात फरक आहे. धाडसी विचारसरणीच्या आधारावर, असा कंटेन्ट सादर केला जाऊ शकतो जो संपूर्ण कुटुंब एकत्र बसून पाहू शकेल, तर दुसरीकडे, बोल्ड कंटेंट येतो ज्याचा ओटीटीच्या जगात वेगळा प्रेक्षकवर्ग आहे.

लस्ट स्टोरीज २ मध्ये ४ कथा आहेत. 'मेड फॉर इच अदर' या पहिल्या कथेत आपण एका धाडसी आजीला (नीना गुप्ता) भेटतो. जी तिची नात वेद (मृणाल) आणि तिचा भावी नवरा (अर्जुन) यांना त्यांच्या दोन्ही कुटुंबांसमोर विवाहपूर्व लैंगिक संबंध ठेवण्याचा सल्ला देते. आता या मोकळ्या मनाच्या आजीच्या या सल्ल्यानंतर दोन्ही कुटुंबांवर काय परिणाम होतो, वेद आणि अर्जुन तिच्या सल्ल्याचे पालन करतात का, हे या कथेत दाखवले आहे. (Latest Entertainment News)

'द मिरर' या दुस-या कथेत इशिता ही वर्किंग वूमनला आपण भेटतो, जिला तिच्या मोलकरणीला तिच्या पलंगावर सेक्स करताना पाहून धक्का बसतो. पण उच्च नसताना देखील तिला चोरून पाहणाची तिचा सवय लागते. ती एकटीच त्याचा आनंद घेते. कोंकना सेन शर्मा दिग्दर्शित कथेत इशिताची तिच्याच घरातील ही चोरी पकडली जाईल की नाही, हे दाखवण्यात आले आहे.

या चित्रपटाच्या तिसऱ्या कथेची कमान सुजॉय घोष यांच्यावर आहे. सेक्स विथ एक्समध्ये विजय वर्मा समोर येतो, जो त्यांच्या घरचा जावई तसेच एका मोठ्या कंपनीचा सीईओ आहे. विजय त्याच्या लक्झरी लाइफचा आनंद घेत आहे आणि त्याची एक्स पत्नी शांती (तमन्ना भाटिया) सोबत भांडतो. आपले पहिले प्रेम (वासना) पाहून आश्चर्यचकित झालेला विजय पुन्हा एकदा शांतीसोबत एक प्लॅन बनवतो, दोघांच्या या प्लॅनिंगमुळे कथेत आणखी एक जबरदस्त ट्विस्ट येतो, जो तुम्हाला या भागात पाहायला मिळेल.

देवयानी (काजोल) आणि सूरज सिंग (कुमुद मिश्रा) यांच्याभोवती फिरणारी तिलचट्टा ही या चित्रपटाची शेवटची कथा आहे. कोठ्यातून राजघराण्याची राणी बनलेल्या देवयानीला आपल्या मुलाला शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवायचे आहे. तर दुसरीकडे महाराजा सूरजसिंगला प्रत्येक स्त्रीकडे वाईट नजरेने पाहत असतो. अशा परिस्थितीत देवयानी आपला पती सूरज सिंग विरद्ध काही धाडसी पाऊले उचलते, जी आपल्याला या कथेत पाहायला मिळतील.

लस्ट स्टोरीज 1 ही एक रिफ्रेशिंग स्टोरी होती पण आता असा कंटेन्ट अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे, ज्यात अनेक उत्कृष्ट कथा आहेत. त्यामुळे लास्ट स्टोरीज २ कडून जास्त अपेक्षा ठेवू नका. वीकएंडला काही पर्याय नसेल तर तुम्ही हा चित्रपट पाहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT