Munmun Dutta And Raj Anadkat  Saam Tv
मनोरंजन बातम्या

खरंच Taarak Mehta Ka Oolthah Chashma च्या 'बबीता'ने 'टप्पू'सोबत गुपचूप साखरपुडा केला?, मुनमुन दत्ताने सांगितलं सत्य

Munmun Dutta And Raj Anadkat Engagement: बबीता आणि टप्पूने गुपचूप साखरपुडा केल्याची बातमी समोर आली होती. मुनमुनने ९ वर्षांनी लहान असलेल्या राजशी साखरपुडा केल्याचे म्हटले जात होते. पण आता यावर अभिनेत्री मुनमुनची प्रतिक्रिया आली आहे.

Priya More

Taarak Mehta Ka Oolthah Chashma:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही प्रेक्षकांची सर्वात आवडती मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेमध्ये बबीताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) आणि जेठालालचा मुलगा टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकट (Raj Anadkat) हे चर्चेत आले आहे.

बबीता आणि टप्पूने गुपचूप साखरपुडा केल्याची बातमी समोर आली होती. मुनमुनने ९ वर्षांनी लहान असलेल्या राजशी साखरपुडा केल्याचे म्हटले जात होते. पण आता यावर अभिनेत्री मुनमुनची प्रतिक्रिया आली आहे. मुनमुनने साखरपुड्याचे वृत्त खोटं असल्याचे सांगितले आहे.

राज अनादकटसोबत साखरपुडा केल्याच्या बातम्यांनंतर मुनमुन दत्ताने पुढे येत यावर प्रतिक्रिा दिली आहे. हे सगळे वृत्त खोटं असल्याचे तिने सांगितले आहे. मुनमुनने नुकताच Indiaforums शी बोलताना सांगितले की, माझ्या साखरपुड्याची बातमी पूर्णपणे मुर्खपणाची आहे. यात काहीही सत्यता नाही. अशा खोट्या बातम्यांवर मला शक्ती आणि लक्ष वाया घालवायचे नाही.'

मुनमुन दत्तानंतर राज अनादकटच्या टीमने या बातम्यांवर मौन सोडले आणि इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, 'मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही सोशल मीडियावर ज्या बातम्या पाहत आहात त्या पूर्णपणे बनावट आणि निराधार आहेत.' मुनमुन आणि राज यांनी त्यांच्या साखरपुड्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. त्यामुळे आता दोघांचाही साखरपुडा झाला नसल्याचे कन्फर्म झाले आहे.

raj anadkat post

दरम्यान, बुधवारी असे वृत्त समोर आले होते की, 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतील मुनमुन आणि राज यांनी गुपचूप साखरपुडा केला.या कपलने मुंबईपासून दूर गुजरातमधील वडोदरामध्ये आपल्या कुटुंबीयांच्या उपस्थितीमध्ये साखरपुडा केला. राज आणि मुनमुन यांच्या वयामध्ये ९ वर्षांचे अंतर आहे. मुनमुन दत्ता ही ३६ वर्षांची आहे तर राज अनादकट हा २७ वर्षांचा आहे. साखरपुड्यानंतर हे कपल लवकरच लग्न करणार असल्याचे देखील म्हटले जात होते. पण आता या दोघांनी देखील साखरपुड्याचे वृत्त खोटं असल्याचे सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Archana Puran Singh: अर्चना पूरन सिंहला झालेला गंभीर CRPS आजार नेमका आहे तरी काय? जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Live News Update : जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार, पॅन आणि मतदान कार्ड कचऱ्यात

Nose Blackheads Removal Tips: नाकावरचे ओपन पोअर्स कसे घालवायचे? घरगुती 4 सोपे उपाय करा

Women Health Care: महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची; स्त्रीरोग तज्ज्ञांनी सांगितलं 'हे' सल्ले

Mumbai Crime : समलैंगिक प्रेमाचा धक्कादायक शेवट! घरी जाण्यास नकार दिला, पार्टनरने छातीत चाकू खुपसला अन्...

SCROLL FOR NEXT