Munmun Dutta And Raj Anadkat Saam Tv
मनोरंजन बातम्या

Taarak Mehta Ka Oolthah Chashma च्या 'बबीता'ने जेठालालच्या 'टप्पू'सोबत केला साखरपुडा, लवकरच अडकणार लग्नबंधनात

Munmun Dutta And Raj Anadkat: या मालिकेमध्ये बबीताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) आणि जेठालालचा मुलगा टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकट (Raj Anadkat) चर्चेत आले आहे.

Priya More

Munmun Dutta And Raj Anadkat Engagement:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) प्रेक्षकांना खळखळवून हसवत आहे. या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांचे आवडते आहे. या मालिकेमध्ये बबीताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) आणि जेठालालचा मुलगा टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकट (Raj Anadkat) चर्चेत आले आहे. बबीता आणि टप्पूने गुपचूप साखरपुडा केल्याची बातमी समोर आली आहे.

मुनमुन दत्ता आणि राज अनादकट यांची लव्हस्टोरी खूपच जबरदस्त आहे. दोघांच्या वयामध्ये ९ वर्षांचे अंतर आहे. मुनमुन दत्ता ही ३६ वर्षांची आहे तर राज अनादकट हा २७ वर्षांचा आहे. दोघांनी देखील आपल्या कुटुंबीयांच्या उपस्थितीमध्ये साखरपुडा केला. राजने डिसेंबर २०२२ मध्ये 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका सोडली. तो या मालिकेमध्ये जेठालालचा मुलगा टप्पूची भूमिका साकारत होता.

मुनमुन आणि राजने मुंबईबाहेर आपल्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत साखरपुडा केला. दोघांनीही गुजरातच्या वडोदरामध्ये साखरपुडा केल्याचे सांगितले जात आहे. आाता लवकरच हे कपल विवाहबंधनात अडकणार असल्याचे सांगितले जात आहे. मुनमुन आणि राज यांच्या साखुरपुड्याची बातमी कळताच दोघांच्याही चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

राजने 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेमध्ये एन्ट्री केल्यानंतर तो मुनमुनच्या प्रेमात पडला. दोघेही या मालिकेच्या सेटवरच एकमेकांच्या प्रेमात पडले. तेव्हापासून ते एकमेकांना डेट करत आहेत. या मालिकेच्या सेटवरील सर्वांना त्यांच्या रिलेशनशीपबद्दल माहिती होते. दोघेही लग्न करतील असे अनेकांना वाटत होते. २०२१ मध्ये दोघांनी आपल्या प्रेमाच कबुली दिली होती. अखेर त्यांनी साखरपुडा केला असून लवकरच ते विवाहबंधनात अडकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indurikar Maharaj Daughter Royal Engagement: मुलीचं शाही लग्न, बोला इंदुरीकर काय करायचं?

Free Bike For Aadhaar Card Holders: आधारकार्ड असलेल्यांना मिळणार फ्री बाईक? केंद्र सरकारची फ्री बाईकची योजना?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात काँग्रेसच्या हालचालींना वेग

Parth Pawar: पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का झाला नाही? अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण

Why do Medu Vada have a hole: मेदू वड्याला मधोमध होल का पाडतात? जाणून घ्या रंजक कारण

SCROLL FOR NEXT