Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tarak mehta ka ooltah chashmah: 'तारक मेहता'ला प्रसिद्ध अभिनेत्रीचा राम राम; 5 वर्षानंतर सोडली मालिका

Manasvi Choudhary

टिव्हीवरील तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका लहानापांसून मोठ्यापर्यंत सर्वांचीच आवडती मालिका आहे. गेली १२ वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेतील गोकुळधाम नगरीतील कुटुंब आणि त्याची एकजुट कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस आली. अशातच गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेतील कलाकार सोडून जात आहेत. यामुळे तारक मेहता का उल्टा चश्माचे प्रेक्षक नाराज झाले आहेत.

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सध्या कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत आहे. नुकतंच या मालिकेतील भिडेची मुलगी म्हणजेच सोनू उर्फ पलक सिंधवानीने मालिकेला राम राम केला आहे. सोशल मीडियावर नुकतंच पलकने पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये, "पलकने तारक मेहता का उल्टा चश्मामधील प्रत्येक कलाकारांचे तिच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. तसेच कॅप्शनमध्ये तिने, पलकने सेटवरचा माझा शेवटचा दिवस आहे, मी मेहनत, समर्पण आणि चिकाटीने गेली पाच वर्ष मालिकेत सोनूच्या भूमिकेत होती. आजवरच्या या प्रवासात तुम्ही मला दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल माझ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार

या प्रवासाबद्दल आणि ज्या अविश्वसनीय लोकांसोबत काम करण्याचा मला आनंद झाला त्याबद्दल मी खरोखर कृतज्ञ आहे. मी खूप काही शिकले आहे. हे केवळ सहकारी कलाकारांकडूनच नाही, तर पडद्यामागील प्रत्येकाकडून...., माझ्या हेअरस्टायलिस्टपासून ते स्पॉट टीम, मेकअप टीम आणि इतर सर्वांकडूनही. तुमच्यासोबतचा हा प्रवास अविस्मरणीय असेल."

पलकने काही दिवसांपूर्वीच तारक मेहता मालिकेचे निर्माते यांच्यावर आरोप केला आहे. पलक आणि मालिकेचे निर्माते यांच्यामध्ये वाद असतानाही अभिनेत्री पलकने हा मालिका सोडणार असल्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मालिकेत काम करण्याचा करार मोडल्याचा आरोप निर्मात्यांनी केला होता. निर्मात्यांनी तिला कायदेशीर नोटीस पाठीवली होती. हे सर्व आरोप पलकने फेटाळले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Classical Language Status : अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय? निर्णयाने काय होणार फायदा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Marathi News Live Updates : महायुतीत एकनाथ शिंदे १०० जागा लढवण्यावर ठाम?

Railway Employees Bonus 2024: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, केंद्राने बोनस केला जाहीर; मिळणार 'इतकी' रक्कम

Marathi Classical Language Status : जाहलो खरेच धन्य...! मराठी भाषेला अभिजात दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: शरद पवारांचा एकाच वेळी भाजप-अजित पवारांना धक्का, डाव टाकताच बडे नेते लागले गळाला!

SCROLL FOR NEXT