TMKOC SAAM TV
मनोरंजन बातम्या

TMKOC : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, वडिलांच्या निधनाची भावुक पोस्ट

Shreya Maskar

शैलेश लोढा यांना लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मामुळे (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) जास्त लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमात त्यांनी तारक मेहता ही भूमिका साकरली होती. प्रेक्षकांनी या भूमिकेला आणि त्यांच्या अभिनयाला खूप पसंती दिली. मात्र शैलेश लोढा (Shailesh Lodha) आता या शोचा भाग नाही. शैलेश लोढा हे उत्तम कवी आहेत. नुकतीच शैलेशने त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर एक भावूक पोस्ट केली आहे.

शैलेश लोढाने त्याच्या सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत एक वाईट बातमी शेअर केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी वडिलांचे निधन झाल्याचे सांगितले आहे. चाहत्यांनी पोस्टवर कमेंट्स करून वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

आपल्या वडिलांसोबतचा फोटो शेअर करून त्यांनी ही बातमी चाहत्यांना दिली आहे. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, "मी जो काही आहे...मी तुमची सावली आहे...आजच्या सकाळच्या सूर्याने जग उजळून निघाले पण आमच्या आयुष्यात अंधार झाला...वडील मला सोडून गेले...अश्रूंना भाषा असती तर मी काहीतरी लिहू शकलो असतो... पुन्हा एकदा हाक मारा ना...बबलू" शैलेश लोढा यांच्या या भावूक पोस्टवर अनेक चाहते दुःख व्यक्त करत आहेत.

शैलेश लोढाने TMKOC का सोडलं?

शैलेश लोढा सुरुवातीपासून तारक मेहता का उल्टा चष्मा शो सोबत जोडले गेले होते. त्यांनी 2022 मध्ये शोचा निरोप घेतला. मीडिया रिपोर्टनुसार, निर्माते असित मोदींच्या असभ्य वर्तणूकीमुळे शैलेश लोढा यांनी कार्यक्रम सोडला कारण यामुळे ते खूप दुखावले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT