Udaysingh Peshwa: पेशवा घराण्याचे ९वे वंशज डॉ. उदयसिंह पेशवा यांचं निधन

Pune News: पेशवा घराण्याचे नववे वंशज आणि श्री देवदेवेश्वर संस्थानचे ज्येष्ठ विश्वस्त डॉ. विनायक विश्वनाथ उर्फ उदयसिंह पेशवा (वय ८६) वृद्धापकळाने निधन झालं.
पेशवा घराण्याचे ९वे वंशज डॉ. उदयसिंह पेशवा यांचं निधन
Dr. Udaysingh PeshwaSaam Tv
Published On

पेशवा घराण्याचे नववे वंशज आणि श्री देवदेवेश्वर संस्थानचे ज्येष्ठ विश्वस्त डॉ. विनायक विश्वनाथ उर्फ उदयसिंह पेशवा (वय ८६) वृद्धापकळाने निधन झालं. वैकुंठ स्मशानभूमीमध्ये रात्री उशीरा त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, उदयसिंह पेशवा यांच्या मागे पत्नी जयमंगलाराजे पेशवा, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. उदयसिंह पेशवा हे पेशव्यांचे नववे वंशज होते.

पेशवा घराण्याचे ९वे वंशज डॉ. उदयसिंह पेशवा यांचं निधन
CM Eknath Shinde: 'लाडकी बहीण' प्रमाणेच 'सुरक्षित बहीण' ही जबाबदारीही शासनाचीच, कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही: मुख्यमंत्री

उदयसिंह पेशवा हे गेल्या ५७ वर्षांपासून श्री देवदेवश्वर संस्थानचे विश्वस्त होते. पेशवा यांनी हॉलंडमधून भूगर्भशास्त्र या विषयातील उच्चशिक्षण पूर्ण केलं होतं. पीएचडीनंतर ते पुण्यात आले. अनेक वर्ष ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ते भूगर्भशास्त्र विभागाचे प्रमुख होते.

पेशवा घराण्याचे ९वे वंशज डॉ. उदयसिंह पेशवा यांचं निधन
Vaibhav Naik: वैभव नाईक यांच्यावर गुन्हा! शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर फोडलं होतं PWD चं कार्यालय

उदयसिंह पेशवा यांनी भूगर्भशास्त्र, भूजलसाठ्याचा अभ्यास, संशोधन आणि नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी त्यांनी भारत भ्रमण केलं होतं. या विषयातील संशोधनामध्ये त्यांचे मोठे योगदान होते. शैक्षणिक, संशोधन क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करतानाच, त्यांनी श्री देवदेवेश्वर संस्थांच्या व्यवस्थापनातही सक्रीय सहभाग नोंदवला पेशवा घराण्याचा नावलौकिक जपण्यासाठी त्यांनी आयुष्यभर उल्लेखनीय कार्य केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com