Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Saam TV
मनोरंजन बातम्या

तारक मेहता..'मध्ये दयाबेनची होणार पुन्हा एन्ट्री?

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेमध्ये पुन्हा दया बेनची एन्ट्री होणार आहे. दयाबेनचं हे पात्र कोण साकारणार आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : टीव्ही जगतातील प्रसिद्ध विनोदी मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah). २८ जुलै २००८ मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने आज तब्बल ३४७६ एपिसोड पूर्ण केले आहेत. या मालिकेमध्ये प्रत्येक पात्रानं आपली वेगळी छाप उमटवली आहे. यातच जेठालाल आणि दयाबेन हे पात्र प्रेक्षकांच्या खास पसंतीचं ठरलं आहे. मालिकेमध्ये जेठालालचं पात्र अभिनेता दिलीप जोशी (actor) साकारत आहेत. तर दयाबेनचं पात्र दिशा वकानी ही अभिनेत्री (actress) साकारत होती. परंतु मधल्या काही दिवसांमध्ये तिने ही मालिका सोडली होती. त्यामुळे मालिकेमध्ये दयाबेनची पोकळी निर्माण झाली होती. आता असे बोलले जात आहे की, मालिकेमध्ये पुन्हा दया बेनची एन्ट्री होणार आहे. दयाबेनचं हे पात्र कोण साकारणार आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हे देखील पाहा -

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या कार्यक्रमाच्या प्रोमोद्वारे दयाबेन परत येईल, अशी माहिती समोर येत आहे. प्रोमोच्या सुरुवातीला दाखवले जाते, सुंदरलाल जेठालालसोबत फोनवर बोलत असतो की 'बहना' नक्की येईल, तेव्हाच दयाची सावली मागे दिसते. जेठालाल दया येणार हे ऐकून आश्चर्यचकीत होतो. तेव्हाच सुंदरलाल बोलतो, 'बहनाला मी स्वतः अहमदाबादवरून मुंबईला घेऊन येणार आहे'. त्यानंतर जेठालाल त्याला विचारतो 'तू माझी मस्करी तर नाही करत ना?' त्यावर सुंदरलाल म्हणतो 'मी अजिबात मस्करी करत नाही. परवा बहना मुंबईला येणार म्हणजे येणार, असं सुंदर वचन देतो तुम्हाला. सुंदरचं हे बोलणं ऐकून जेठालाल खूप खूश होतो.

कोण असेल दयाबेन...?

शेवटी जेठालाल म्हणतो , 'वाह वाह सुंदर, पहिल्यांदा तू बोललेली कोणती गोष्ट मला आवडली आहे . कमाल बातमी सांगितलीस तू मला'. या प्रोमोनुसार दोन दिवसांमध्ये प्रेक्षकांना मालिकेमध्ये दयाबेन बघायला मिळणार आहे. परंतु अजूनही दया बेनचं पात्र पुन्हा दिशा वकानी साकारणार आहे की मालिकेत नवीन दया येणार आहे, हे अजून मालिकेच्या निर्मात्यांनी गुलदस्त्यात ठेवलं आहे.

सुंदरने दिली जेठालालला आनंदाची बातमी...

प्रोमोला शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले, की 'सुंदरने दिली जेठालालला आनंदाची बातमी. काय असेल ही आनंदाची बातमी...? जाणून घेण्यासाठी पाहत राहा 'तारक मेहता का उल्टा चश्मा'.

Edited By - Shruti Kadam

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

SCROLL FOR NEXT