Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Saam Tv
मनोरंजन बातम्या

Taarak Mehta Birthday: अशी होते 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ची शूटिंग...

Chetan Bodke

Taarak Mehta Birthday: 'सब' टीव्हीवरील गेल्या १४ वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. गेल्या बऱ्याच वर्षांपासून या मालिकेचा टीआरपी अव्वल आहे. या मालिकेतील पडद्यावरील आणि पडद्यामागील माहिती जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.

मग ती माहिती कलाकारांची असो किंवा काही मजेदार किस्से असो. केवळ कथा आणि पात्रचं नाही तर, ही ‘गोकुळधाम सोसायटी’सुद्धा फार प्रसिद्ध झाली आहे. मालिका पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला अशा सोसायटीत घर घेण्याचं ड्रिम आहे. (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)

अनेक प्रेक्षकांचा असा गोड गैरसमज आहे की, मुंबईतील (Mumbai) गोरेगाव या भागात ही सोसायटी आहे. तुम्ही पण असाच काही विचार करताय का? मग आधी ही बातमी वाच आणि मगच विचार करा. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील असणारी ही सोसायटी खऱ्या आयुष्यात अस्तित्वात नाही.

गोरेगावमध्ये या नावाची कोणती सोसायटी आहे ना तिथे कोणाची घरं आहेत. गोकुळधाम सोसायटीचे दोन भाग असून त्याची शूटिंग दोन वेगवेगळ्या ठिकाणी झाले आहे हे तुम्हाला माहीत आहे का? (Viral video)

होय, हे बरोबर आहे. या शोमध्ये गोकुळधाम सोसायटीचा सीन दोन वेगवेगळ्या ठिकाणी सेट तयार करत शूटिंग करण्यात येते. बाल्कनी आणि कंपाऊंडची शूटिंग फिल्मसिटीत करण्यात येते, तर त्या सोसाटीतील सदस्यांच्या घरातील शूटिंग करण्यासाठी कांदिवलीतील एका सोसायटीत शूटिंग केली जाते.

सर्व कलाकारांच्या सोयीनुसार आणि वेळेनुसार या शूटिंगचे वेळापत्रक तयार केले जाते. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी सेट तयार करण्यात आला आहे. सध्या या मालिकेची शूटिंग गोरेगावमधील फिल्मसिटीत केली जात आहे.

२८ जुलै २००८ रोजी तारक मेहता का उल्टा चष्माचा पहिला भाग प्रसारित झाला होता. तेव्हापासून हा सर्वात जास्त काळ चालणारा कॉमेडी शो होईल असे कुणाला वाटले असेल. गेल्या १४ वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहेत. त्यातील पात्रे प्रेक्षकांच्या हृदयात पक्के स्थान निर्माण करुन आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain News: राज्यातील पावसाची खबरबात! कुठे सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार तर कुठे पिकांनाही फटका

Video: मतदानाआधीच बोटाला शाई? उद्धव ठाकरे यांचा भाजपवर सनसनाटी आरोप, नेमकी भानगड काय?

Today's Marathi News Live: शेगाव खामगाव परिसरात मुसळधार पाऊस

Mumbai News: २४७५ अधिकारी, २२१०० अंमलदार आणि ६२०० होमगार्ड; मतदानासाठी मुंबई पोलीस सज्ज

Sanjay Raut News: संजय राऊत यांच्यावर अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल! नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT