Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Saam Tv
मनोरंजन बातम्या

Taraka Mehta Ka Oolata Chashma: चाहत्यासाठी खुशखबर, 'तारक मेहता का उलटा चष्मा'मध्ये 'या' कलाकाराची रिएन्ट्री

सुप्रसिद्ध मालिका आणि प्रेक्षकांच्या आवडत्या भूमिका, असे असूनही कलाकार करतात मालिकेला रामराम.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: 'तारक मेहता का उलटा चष्मा' ही टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका (Serial) आहे. गेली १४ वर्ष सातत्याने ही मालिका आणि या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. मालिकेचे चाहते आहेतच परंतु मालिकेतील प्रत्येक कलाकारचा (Actor) चाहता वर्ग आहे. प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेले हे कलाकार मालिका सोडून गेले आहेत. प्रेक्षकांना त्याच्या लाडक्या कलाकारांना मालिकेमध्ये पुन्हा बघण्याची इच्च्छा आहे आणि तशी मागणी प्रेक्षक वारंवार करत आहेत.

मालिकेतील एक पात्र बरेच दिवस प्रेक्षकांच्या समोर आलेले नाही. आम्ही दयाबेन विषयी बोलत नसून तिचा लाडका मुलगा टप्पूबद्दल बोलत आहोत. गेल्या अनेक महिन्यांपासून टप्पू मालिकेत दिसला नाहीये. टप्पूची भूमिका बरीच वर्ष राज अनादकट साकारत होता. राजने तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका सोडल्याची चर्चा सुरू आहे. राज मोठ्या पडद्यावर दिसणार आहे आणि त्यासाठी तो तयारी करत आहे. रणवीर सिंगसह काम करताना तो आपल्याला दिसू शकतो. याशिवाय राज अनादकटचा एक म्युसिक व्हिडिओ (Video) देखील प्रदर्शित झाला आहे.

राज अनादकटच्या जागी भव्य गांधी दिसण्याची शकता आहे. मालिकेत सर्वात पहिली टप्पूची भूमिका भव्य गांधीने (Bhavya Gandhi) साकारली होती. त्याने या भूमिकेला आयकॉनिक बनवले होते. भव्य गांधीला या भूमिकेमुळे प्रसिद्धी सुद्धा मिळाली होती. परंतु काही वर्षपूर्वी त्याने मालिकेतून एक्सिट घेतली होती. आता तो गुजराती चित्रपटात काम करत आहे. कोरोना काळात त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले. भव्य गांधी पुन्हा एकदा त्याने साकारलेल्या आयकॉनिक टप्पूच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : गुंड गजा मारणेला १५ आणि १६ तारखेला पुणे शहरात येण्यास परवानगी

Cancer Risk In Men: सतत लघवी होतेय? साधी वाटणारी ही समस्या असू शकते कॅन्सरचं लक्षण; पुरुषांनी वेळीच सतर्क व्हा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपकडून मोठी कारवाई, बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी

ZP Election : जिल्हा परिषद निवडणुकीची तारीख आली समोर, आयोगाला कोर्टाने दिली पुन्हा मुदत, वाचा

The 50 Contestants: किम शर्मापासून धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलपर्यंत; कोण-कोण असणार 'द 50'मध्ये? वाचा यादी

SCROLL FOR NEXT