Babita Hugged To Jethalal Video Viral Instagram
मनोरंजन बातम्या

Jethalal And Babita Viral Video: जेठालालचा १४ वर्षांचा वनवास संपला; बबीताने आनंदाच्या भरात थेट... व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या उलटसुलट चर्चा

जेठालालचे तब्बल अनेक वर्षांपासूनचे कधी ही पूर्ण न झालेले स्वप्न आजच्या भागात पूर्ण होणार आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Babita Hugged To Jethalal Video Viral: गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी टेलिव्हिजनसृष्टीत प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारी मालिका आजही प्रेक्षकांच्या पसंदीस उतरते. २००८ पासून सुरू झालेली ही मालिका आजही प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करते. जेठालाल, दयाबेन, बबीता, भिडे आणि इ... हे सर्व पात्र आजही प्रेक्षकांना फारच भावते.

जेठालाल आणि बबिताची लव्ह केमिस्ट्री प्रेक्षकांना आजही फार आवडते. पत्नी दयाबेनला विसरून जेठालाल बबिताच्या विचारात पूर्णपणे मग्न राहिलेला जेठाचे आज एक स्वप्न पुर्ण होणार आहे. चला तर जाणून घेऊया आजच्या भागाविषयी....

नुकताच मालिकेतील आजच्या भागाचा एक टीझर सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या टीझरमध्ये, बबीताला एक लॉटरीचं टिकीट मिळतं आणि ते ती जिंकते. लॉटरीचं टिकीट जिंकल्यावर तिच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्यावेळी सोसायटीतील उपस्थितांमध्ये जेठालाल पण होता.

जेठालाल समोर दिसताच त्याला ती अलिंगन करते. बबिता जेठालालला मिठी मारताच त्या क्षणी त्याला काही वेळासाठी विश्वास बसत नाही. त्याला काही वेळासाठी मी स्वप्न बघतोय की काय? असं होतं. व्हिडिओमध्ये तो हैराण होताना दिसत आहे. जरी थोडं आश्चर्य वाटत असलं तरी जेठालालच्या मनात लाडू फुटत होते.

ही व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी एक नेटकरी म्हणतो, आयुष्यात कधी ही हार मानू नये. कधी ना कधी आपले स्वप्न पुर्ण होतेच. तर आणखी एक म्हणतो, जेठालालचा १४ वर्षांचा वनवास संपला.

तर आणखी एक म्हणतो, जेठालालला लवकरच मोक्ष प्राप्त होईल. एक जण तर इतक्यावरच थांबला नाही, तो म्हणतो, स्वप्न पुर्ण झाले, आज रियल लाईफमधली लॉटरी जेठालाल जिंकला. म्हणत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची खिल्ली उडवत आहे.

जेठालालची भूमिका प्रसिद्ध अभिनेते दिलीप जोशी यांनी साकारली आहे, तर मुनमुन दत्ताने बबिताचे पात्र साकारले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : आठवा वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट, २०२९ लोकसभेआधी कर्मचार्‍यांचा पगार वाढणार; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: नवले ब्रीज अपघात प्रकरणी गुन्हा दाखल, तिघांवर गुन्हा दाखल

Pune Accident News : १५ गाड्या चिरडल्या, ८ जणांचा होरपळून गेला जीव, १५ जण जखमी; दुर्घटनेतील मृतांची अन् जखमींची नावे आली समोर

Delhi Blast: सिरीयल स्फोटाचा कट उधळला, दहशतवाद्यांच्या टार्गेटवर 4 शहर; 32 गाड्यांमध्ये विध्वंसक बॉम्ब?

Eyelashes Care: खोट्या पापण्या वापरणं करा बंद; फक्त या घरगुती सामग्रीच्या तेलाने पुन्हा जाड आणि लांब होतील पापण्या

SCROLL FOR NEXT