Jennifer Mistry Bansiwal Yandex
मनोरंजन बातम्या

Jennifer Mistry Bansiwal: भावाचा मृत्यू, बहिण व्हेंटिलेटरवर; काम मिळत नसल्याने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेत्री आर्थिक अडचणीत

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Actress: टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवाल सध्या अडचणींचा सामना करत आहे. भावाच्या मृत्यूनंतर तिच्या लहान बहिणीची प्रकृती चिंताजनक आहे. आर्थिक अडचणीमुळे बहिणीला सरकारी रुग्णालयात दाखल करावे लागले.

Rohini Gudaghe

प्रसिद्ध टीव्ही शो (TV Show) 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवाल मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. याआधी ही अभिनेत्री शोचे निर्माते असित मोदी यांच्यासोबतच्या वादामुळे चर्चेत (Jennifer Mistry Bansiwal) आली होती. आता पुन्हा एकदा तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जेनिफर अजून तिच्या धाकट्या भावाच्या मृत्यूच्या दुःखातून सावरली नव्हती. तेच आता तिच्या धाकटी बहीणीची प्रकृती गंभीर असल्याचं समोर आलं आहे. खुद्द अभिनेत्रीनेच तिच्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे.

जेनिफर मिस्त्री बन्सीवालने तिच्या चाहत्यांना माहिती देताना सांगितलं की, तिच्या लहान बहिणीची प्रकृती गंभीर आहे. सध्या ती व्हेंटिलेटरवर आहे. जेनिफर म्हणाली की, 'माझी धाकटी बहीण जीवन आणि मृत्यूशी संघर्ष करत (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Actress) आहे. तिची काळजी घेण्यासाठी मला तिच्यासोबत राहावे लागत आहे. म्हणूनच मी माझ्या गावी आले आहे. सध्या तिच्याकडे कोणतेही काम नसल्याची माहिती मिळत आहे.

माझ्या लहान भावाचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर माहेरच्या सात मुलींची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. पैशांच्या अडचणीमुळे आईने माझ्या बहिणीला जबलपूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल केलं (Jennifer Mistry Bansiwal News) आहे. या सर्व गोष्टी एकत्र सांभाळणे माझ्यासाठी खूप कठीण जात आहे. गेल्या काही वर्षांपासून अत्यंत कठीण टप्प्यातून जात असल्याचं जेनिफरने म्हटलं आहे. टाईम्स ऑफ इंडियासोबत बोलताना अभिनेत्री जेनिफरने ही माहिती दिली आहे.

जेनिफरने असंही सांगितलं की, तिला आतापर्यंत 'तारक मेहता' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) सोडल्यानंतर कोणत्याही भूमिकेची ऑफर आलेली नाही. परंतु एक प्रोडक्शन हाऊस आहे, ते तिच्यासारख्या पात्राच्या शोधात आहे. कदाचित ते लोकं शोसाठी तिच्याशी संपर्क साधतील. काही काळापूर्वी जेनिफरने 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या निर्मात्याविरोधात लैंगिक छळाचा खटला जिंकला (Entertainment News) होता.

न्यायालयाने असित मोदी यांना 5 लाख रुपये भरपाई देण्यास सांगितलं आहे. मात्र, अद्यापपर्यंत जेनिफरला नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही. 5 लाख रुपयांच्या नुकसानभरपाईसाठी 17 एप्रिलपर्यंत थांबण्यास सांगण्यात आलं (Actress Jennifer Mistry Bansiwal) आहे, अशी माहिती जेनिफरने दिली आहे. याशिवाय तिला असित मोदींकडून त्याची देय रक्कम अंदाजे 25 लाख रुपये आहे, ती वसुल करायची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

IND vs AUS: चेतेश्वर पुजाराची बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत एन्ट्री! या नव्या भूमिकेत दिसणार

SCROLL FOR NEXT