Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Saam Tv
मनोरंजन बातम्या

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता....' फेम अभिनेत्रीला कॅन्सर

दया बेनची भूमिका करणारी अभिनेत्री दिशा वाकानीबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही टीव्ही विश्वातील एक लोकप्रिय मालिका आहे. मालिकेतील दयाबेनचं पात्र साकारणाऱ्या दिशा वाकानीने अभिनयानं लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. वो.. ये ..हॅलो या सुप्रसिद्ध डायलॉगने दयाबेनने विशेष लोकप्रियता मिळवली आहे. आता या मालिकेतील दया बेनची भूमिका करणारी अभिनेत्री दिशा वाकानीबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. माहितीनुसार, दिशाला घशाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे.

अभिनेत्री दिशा वकानी गेली अनेक वर्षे दयाबेनची व्यक्तिरेखा साकारत आहे. दिशा वाकानीने २०१९ मध्ये प्रसूती रजेचे कारण देत या शोला रामराम केला. तेव्हापासून ती शोमध्ये परतण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. शोमध्ये परतण्यासाठी निर्मात्यांनी अनेकदा तिच्याशी संपर्क साधला पण तिने नकार दिला. दिशा शोची सर्वात लोकप्रिय आणि आवडती अभिनेत्री आहे.

दिशाने तिच्या भूमिकेविषयी सांगताना म्हटले होते की, दयाबेन हे पात्र साकारताना तिच्या आवाजात बदल करावे लागतात. दयाबेनचा आवाज खूप विचित्र आहे. प्रत्येक वेळी आवाजाचा समतोल कायम ठेवणे खूप कठीण होते. या समआवाजाने ती दिवसाचे 11-12 तास सतत शूटिंग करत असते.

दिशा वाकानीने शो सोडल्यापासून तिची व्यक्तिरेखा संपली आहे. त्याऐवजी निर्माते नवीन अभिनेत्रीच्या शोधात आहेत. दरम्यान, दया बेनच्या भूमिकेसाठी ऐश्वर्या सखुजा, काजल पिसाळ अशा अनेक अभिनेत्रींची नावे पुढे आली आहेत. मात्र, ती केवळ अफवा असल्याचे सांगण्यात आले. दिशा गेल्यानंतर इतर अनेक कलाकारांनी देखील या शोला रामराम केला आहे.

Edited By- Manasvi Choudhary

Pudachi Wadi Recipe: रोज कोथिंबीर वडीच कशाला? विदर्भ स्पेशल पुडाच्या वडीची रेसिपी लगेचच घ्या नोट करुन

Maharashtra Live News Update: सुप्रिया सुळे पुण्याच्या दिशेने रवाना

Shocking : सूनेचं प्रेमप्रकरण कळलं, सासरा अडवायला लागला; तिनं बॉयफ्रेंडला गळ घातली अन् शेवट झाला भयंकर

गृहिणी ते खासदार, आता उपमुख्यमंत्री! सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ, VIDEO

Sunetra Pawar: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कोण आहेत?

SCROLL FOR NEXT