Tarak Mehta Ka Ooltah Chashma Dayaben Disha Vakani Saam Tv
मनोरंजन बातम्या

Disha Vakani Comeback : दयाबेन पुन्हा येतेय भेटीला, तारक मेहताच्या निर्मात्यांची मोठी घोषणा, पण...

TMKOC Update: दिशा वकानी शोमध्ये पुनरागमन करणार निर्मात्यांनी सांगितले आहे.

Pooja Dange

Disha Vakani Comeback In Tarak Mehta : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही टीव्हीवरील मालिकेला २८ जुलैला १५ वर्ष पूर्ण झाली आहेत. गेली १५ वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ही मालिका प्रेक्षकांच्या खूप जवळ आहे. या मालिकेतील पात्र प्रेक्षकांना त्याच्या आजूबाजूला वावरत आहेत असे वाटते. या मालिकेतील एक पात्र जे प्रेक्षक कधीही विसरू शकत नाहीत ते म्हणजे दयाबेन. दयाबेन 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चा प्राण आहे.

जेठालालची भूमिका प्रसिद्ध अभिनेते दिलीप जोशी १५ वर्ष साकारत आहेत, तर दयाबेनची भूमिका दिशा वकानीने केली आहे, ती गेल्या 6 वर्ष या मालिकेपासून दूर आहे. 2017 मध्ये, दिशाने प्रसूती रजा घेतली आणि त्यानंतर ती शोमध्ये परतली नाही. 6 वर्षांनंतरही केवळ निर्मातेच नाही तर प्रेक्षकही तिची आतुरतेने वाट पाहत आहेत.

पुन्हा एकदा दिशा, दयाबेनच्या भुमिकेत प्रेक्षकांना हसवणार आहे. असित मोदी बऱ्याच दिवसांपासून नवीन दयाबेनच्या शोधात होते, पण दिशासारखी अभिनेत्री त्यांना मिळाली नाही. ते दिशाला परत आणण्यासाठी प्रयत्न करत होते. आता असितने यांनी चाहत्यांना सरप्राईज दिले आहे. दिशा वकानी शोमध्ये पुनरागमन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

अलीकडे, TMKOC ला 15 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, असितने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी घोषणा केली. कार्यक्रमात असित म्हणाले, "१५ वर्षांच्या या प्रवासाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.

एक कलाकार आहे ज्याला आपण विसरू शकत नाही. दया भाभी उर्फ ​​दिशा वकानी. तिने चाहत्यांचे मनोरंजन केले आहे आणि आपल्याला हसवले आहे. चाहते तिच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. मी तुम्हाला वचन देतो, दिशा वकानी लवकरच तारक मेहतामध्ये परतणार आहे.” (Latest Entertainment News)

दिशा वकानीने सन २०१५ मध्ये चार्टर्ड अकाउंटंट मयूर पडियासोबत लग्न केले. लग्नाच्या दोन वर्षांनी म्हणजेच २०१७ मध्ये दिशा आणि मयूरला मुलगी झाली. त्यावेळी दिशाने तारक मेहता शोमधून ब्रेक घेतला होता.

गेल्या वर्षी दिशाने मुलाला जन्म दिला. दिशा शोमध्ये परतणार नसल्याच्या बातम्या येत होत्या, पण असित मोदीच्या या वक्तव्यावरून दिशाने परत येण्याचे ठरवले आहे, हे निश्चित झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजित पवारांच्या आमदारावर अटकेची टांगती तलवार? राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Success Story: १० बाय १०च्या खोलीत फुलवली केशरची शेती, संभाजीनगरच्या लेकीचा यशस्वी प्रयोग

Maharashtra Politics: बड्या नेत्यांना हवं भाजपचं वाशिंग मशिन? मित्र पक्षांनाही भाजपची भुरळ

Maharashtra Live News Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार

Honeymoon Spot : कुठं कुठं जायाचं हनिमूनला? 'हे' आहे भारतातील बेस्ट लोकेशन, येथे जाताच स्वित्झर्लंड विसराल

SCROLL FOR NEXT