Taarak Mehta Saam Tv
मनोरंजन बातम्या

Taarak Mehta: 'या' उत्कृष्ट लेखणीने 'तारकभाई'ना दिली वेगळी ओळख, शेवटच्या श्वासापर्यंत घेतला होता मनोरंजनाचा वसा...

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचे लेखक , स्तंभलेखक, नाटककार आणि पटकथालेखक तारक मेहता यांची आज जयंती.

Chetan Bodke

Taarak Mehta: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका नेहमीच प्रेक्षकांसाठी चर्चेत असते. या मालिकेचे लेखक , स्तंभलेखक, नाटककार आणि पटकथालेखक तारक मेहता यांची आज जयंती. तारक मेहता यांचे सर्व वाचकांना प्रिय असलेले 'दुनिया ने उंधा चष्मा' या पुस्तकाच्या आधारावर 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत रुपांतर झाले. तब्बल या मालिकेला १४ वर्ष पूर्ण झाले आहे.

मालिकेमुळे लेखक तारक मेहता बरेच प्रकाशझोतात आले आहेत. २०१५ या वर्षात भारत सरकारचा सर्वात मानाचा समजला पुरस्कार 'पद्मश्री' या पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता. हा पुरस्कार भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते देण्यात आला होता. त्यांची ओळख प्रेक्षकवर्गात नेहमी लिखाणातील असलेली विविधता आणि गुजराती नाट्य चळवळीसोबत जोडल्या गेलेल्या नाळेने त्यांना एक वेगळीच ओळख दिली. सोबतच त्यांना 'तारकभाई' या नावानेही चाहते ओळखायचे.

तारक मेहता यांचा जन्म २६ डिसेंबर १९२९ रोजी अहमदाबाद येथे झाला होता. त्यांची ओळख प्रेक्षकांमध्ये आणि वाचकांमध्ये एक उत्कृष्ट साहित्यिक अशी अजूनही कायम आहे.'दुनियाने उंधा चष्मा' १९६५, 'तारक मेहताना आठ एकांकियो' १९७८, 'तारक मेहतानो टपुडो' १९८२, 'तारक मेहतानी टोकळी परदेसना प्रवासे'१९८५ या लोकप्रिय साहित्यांचा समावेश त्यांच्या उत्कृष्ट लेखणीत करता येईल. नेहमीच आपल्या उत्कृष्ट लेखणीने चाहत्यांना हसवले आहे. शेवटच्या श्वासापर्यंत सर्व चाहत्यांना हसवण्याचा वसा हाती घेत त्यांनी सर्वांचे मनोरंजन केले.

तारक मेहतांच्या नावावरुन सुरु झालेली मालिका चाहत्यांना आजही त्याच जोशात हसवते. मालिकेचा चाहत्यांच्या संख्येत अनेकदा चढ- उतार होत असतो. पण नेहमीच प्रेक्षकवर्ग ही मालिका आपले मनोरंजन होण्यासाठी पाहतात. त्यांचे 'वन लाइनर'देखील चाहत्यांना खळखळून हसवायचे. अनेक विनोदी पुस्तकांचे लेखन तारक मेहता यांनी गुजराती भाषेत केले आहे. गुजराती नाट्य चळवळीतील योगदान कधीच न विसरण्यासारखे आहे. मालिकेच्या लिखानासोबतच तारक यांनी तब्बल ८० पुस्तक लिहीली आहेत.

१९७१ पासून 'चित्रलेखा' या मासिकेकरिता लेखन सुरु केले होते. सोबतच १९६० ते १९८६ या कालखंडात तारक मेहता केंद्रिय सुचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या फिल्म डिव्हिजनमध्ये अधिकारी म्हणून जबाबदारी आपल्या खांद्यावर जबाबदारी पेलली होती. सोबतच त्यांचे 'नवूं आकाश नवी धरती' आणि 'कोथळामांथी खिलाडी' हे गुजराती भाषिक पुस्तकं चांगलेच गाजले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics : भाजप मंत्र्यांकडून ऑपरेशन लोटस; बडा नेता कमळ हाती घेणार?

Accident News : हृदयद्रावक! दिवाळीला मामाच्या गावी जाताना काळाचा घाला; थारच्या धडकेत दोन मुलांसह आई-वडिलांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT