Taapsee Pannu And Mathias Boe Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Taapsee Pannu Wedding: तापसी पन्नूने बॉयफ्रेंडसोबत गुपचूप उरकलं लग्न; लवकरच मुंबईत रिसेप्शन पार्टी

Taapsee Pannu: तापसी पन्नूने बॉयफ्रेंड मॅथियास बोईसोबत नुकतीच लग्नगाठ बांधली आहे.

Chetan Bodke

Taapsee Pannu And Mathias Boe Wedding

बॉलिवूडमध्ये सध्या (Bollywood) लगीनघाई सुरू आहे. एकापाठोपाठ एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत नव्या आयुष्याची नवी सुरूवात करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच, रकुल प्रीत- जॅकी भगनानी, क्रिती खरबंदा- पुलकित सम्राट यांनी लग्नगाठ बांधली. आता या कपलनंतर आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री विवाहबंधनात अडकल्याची माहिती समोर येत आहे. रिपोर्टनुसार, तापसीने बॉयफ्रेंड मॅथियास बोईसोबत नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तापसी आणि तिचा बॉयफ्रेंड मॅथियास बोईने २३ मार्च रोजी लग्नगाठ बांधली आहे.

तापसी आणि मॅथियासने उदयपूरमध्ये गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. तापसी आणि मॅथियास यांच्या लग्नामध्ये दोघांचेही कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत त्यांनी सप्तपदी घेतली आहे. न्यूज १८ च्या रिपोर्टनुसार, या कपलने सिक्रेट वेडिंग केले आहे. तापसी आणि मॅथियास यांच्या लग्नामध्ये फक्त बॉलिवूड दिग्दर्शक- निर्माता अनुराग कश्यप यांनी उपस्थिती लावली होती. गेल्या काही दिवसांपासून या कपलच्या लग्नाची चर्चा माध्यमांमध्ये सुरू होती. पण या कपलने कोणालाही न कळता गुपचूप लग्न उरकलं आहे.

तापसी आणि मॅथियास गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हे कपल नेहमी सोशल मीडियावर एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करतात. पण ते नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहतात.

तापसीने अलीकडेच एका मुलाखतीमध्ये मॅथियासबद्दल मोकळेपणाने सांगितले होते की, ती तिच्या पहिला बॉलिवूड चित्रपट 'चश्मे बद्दूर'च्या शूटिंगच्या वेळी मॅथियासला भेटली होती. तापसी पन्नूचा होणारा नवा मॅथियास हा डेन्मार्कचा बॅडमिंटनपटू आहे. मॅथियासने २०१२ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. २०१५ च्या युरोपियन गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावले होते. मॅथियास हा सध्या भारताच्या राष्ट्रीय बॅडमिंटन संघाचा प्रशिक्षक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavatmal Farmer : सरकारने जमा केलेली रक्कम शेतकऱ्यांने केली परत; अतिवृष्टीची तुटपुंजी मदत दिल्याने शेतकरी संतप्त

Amruta Khanvilkar Tattoo: अभिनेत्री अमृता खानविलकरच्या हातावर गोंदवलेला खास टॅटू कोणत्या व्यक्तीचा आहे?

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यातील 6 पंचायत समित्यांच्या सभापदी पदाचे आरक्षण जाहीर

Accident News : फुटबॉलपटूचा भीषण अपघात; दुखापतीमुळे शस्त्रक्रिया, १० महिने चालता येणार नाही

Pawan Singh: पिल्स खायला दिल्या, अबॉर्शन करायला भाग पाडलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचे धक्कादायक आरोप

SCROLL FOR NEXT