Prajakta Gaikwad Wedding saam tv
मनोरंजन बातम्या

Prajakta Gaikwad Wedding : मुहूर्त ठरला! प्राजक्ता गायकवाड 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात, शाही विवाह सोहळ्याची पत्रिका पाहा

Prajakta Gaikwad Wedding Date : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. खास लग्नाची पत्रिका पाहा.

Shreya Maskar

मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लवकरच लग्न बंधानात अडकणार आहे.

प्राजक्ताच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे.

प्राजक्ताने ऑगस्ट महिन्यात साखरपुडा करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. तिच्या लग्न सोहळ्याची शाही पत्रिका समोर आली आहे. 7 ऑगस्ट 2025ला साखरपुडा करून प्राजक्ताने चाहत्यांना आपल्या नात्यांची आनंदाची बातमी दिली होती. प्राजक्ता गायकवाडच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव शंभूराज खुटवड असे आहे. दोघे एकत्र खूपच छान दिसतात. चाहते आता त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत.

अलिकडेच काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने सोशल मीडियावर लग्नपत्रिका पूजनचा व्हिडीओ टाकला होता. तसेच आता तिच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नुकतीच अभिनेत्रीचे केळवण देखील पार पडले आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मराठी ऐतिहासिक मालिकेतून प्राजक्ता गायकवाड प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली. अभिनयासोबतच ती समाज कार्यातही पुढे आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत प्राजक्ता गायकवाडने महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली होती.

लग्नाची तारीख काय?

प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड 2 डिसेंबर 2025 ला लग्न बंधनात अडकणार आहेत. दुपारी 12.24 हा त्यांच्या लग्नाचा शुभ मुहूर्त आहे. त्यांचा शाही विवाह सोहळा पुण्यात खराडी येथे पार पडणार आहे. तर 1 डिसेंबरला हळदी आणि संगीत सोहळा पार पडणार आहे.

होणारा नवरा कोण?

प्राजक्ता गायकवाडचा होणारा नवरा शंभूराज खुटवड एक उद्योगपती आहे. तसेच पैलवान देखील आहेत. खुटवड कुटुंब राजकारणात सक्रिय आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शंभूराज खुटवड हा पुण्याच्या फुरसुंगी येथे राहणारा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले; व्हाईट हाऊस परिसरात २० राऊंड फायर, मुख्य हल्लेखोराचा खात्मा

Famous Actor : बायकोला कॅन्सर, त्यातच वडिलांना ब्रेन स्ट्रोक; ICU मध्ये उपचार सुरू, प्रसिद्ध अभिनेत्यावर दुहेरी संकट

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची एन्ट्री! पुणे, साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा; मुंबईत कसं असेल हवामान?

Maharashtra News Live Update: उष्माघाताने नागपूर जिल्ह्यात ४ जणांचा मृत्यू

Today Horoscope : कुणाच्या नशिबात पैसा, कुणाच्या भाग्यात नोकरी; वाचा आजचे १२ राशींचे भविष्य

SCROLL FOR NEXT