Swapnil Joshi:  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Swapnil Joshi: यंदाचा गुढीपाडवा स्वप्नील जोशीसाठी ठरला खास; 'या' कारणामुळे नव वर्षाची सुरुवात होणार धमाल

Gudi Padwa 2025: अभिनेता स्वप्नील जोशी हा कायम विविध कारणांमुळे चर्चेत असतो. सध्या स्वप्नील 'सुशीला - सुजीत' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Shruti Vilas Kadam

Swapnil Joshi: अभिनय आणि निर्मिती विश्वात स्वतःच वेगळं स्थान निर्माण करणारा स्वप्नील जोशी हा कायम विविध कारणांमुळे चर्चेत असतो. सध्या स्वप्नील अनेक प्रोजेक्ट्स मध्ये व्यस्त आहे पण यंदाचा गुढी पाडवा आणि नवीन वर्ष तो खास तऱ्हेन साजर करणार आहे.

स्वप्नील सध्या " सुशीला - सुजीत " चित्रपटाचं प्रमोशन करतोय आणि यंदाच नव वर्ष साजर करण्यासाठी स्वप्नील पुण्यात जाणार असून चित्रपटाच्या टीम सोबत हा पाडवा साजरा करणार आहे. स्वप्नील या चित्रपटात अभिनेता आणि निर्माता अशी दुहेरी भूमिका साकारणार असून चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता आहे.

स्वप्नील सांगतो " दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा हा गुढी पाडवा माझ्यासाठी तितकाच महत्त्वाचा आणि खास आहे कारण चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने मी गिरगाव, दादर, ठाणे, डोंबिवली इथल्या नववर्ष शोभा यात्रा मध्ये जाऊन सहभाग घेतो आणि तिथला माहोल हा खरंच कमालीचा असतो. नव वर्षाच स्वागत करण्यासाठी छान पारंपरिक अंदाजात सगळेच येतात हा एक उत्सव आहे असं मला वाटतं ! यंदा हा गुढी पाडवा आम्ही सुशीला सुजीत टीम सोबतीने पुण्यात साजरा करतोय. मुंबई सारखा पुण्यात देखील उत्साह असतो आणि तो अनुभवण्यासाठी आम्ही सगळेच उत्सुक आहोत"

कामाचा व्याप असला तरी आपले सणवार मोठ्या दिमाखात साजरे करण्यासाठी स्वप्नील कायम उत्सुक असतो. आता सुशीला - सुजीत सोबतीने स्वप्नील शुभचिंतक या गुजराती चित्रपटात दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT