Swanandi Tikekar And Ashish Kulkarni Kelvan Photos Instagram
मनोरंजन बातम्या

Swanandi Tikekar Kelvan: आशिष - स्वानंदीची लगीनघाई, थाटात पार पडलं पहिलं केळवण; लग्नासाठी बनवला खास हॅशटॅग

Swanandi Tikekar And Ashish Kulkarni Photos: स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांच्या लग्नाची लगबग सुरु झाली असून केळवणाचा कार्यक्रमही पार पडला आहे.

Chetan Bodke

Swanandi Tikekar And Ashish Kulkarni Kelvan Photos

सध्या मराठी टेलिव्हिजनसृष्टीमध्ये सेलिब्रिटींच्या लग्नांची धुम पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांत तीन क्यूट कपल लग्न बंधनात अडकणार आहेत. सध्या सोशल मीडियावर मुग्धा- प्रथमेश, अमृता- प्रसाद यांच्या केळवणाचे फोटो जोरदार व्हायरल होताना दिसून येत आहे. अशातच स्वानंदी आणि आशिषच्याही केळवणाचे फोटो समोर आले आहे. त्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

नुकतंच स्वानंदी आणि आशिषचे केळवण काही मराठी सेलिब्रिटींनी थाटामाटात केले आहे. स्वानंदीने काही तासांपूर्वीच तिच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाउंटवरुन केळवणचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिच्यासोबत फोटोमध्ये सुकन्या मोनेंसह काही सेलिब्रिटीही दिसत आहे.

तिने केळवणचे फोटो शेअर करताना कॅप्शन दिले की, “काऊंटडाऊन सुरु झाले, तुम्ही सर्वांनी आमच्या केळवणाची खूप सुंदर पद्धतीने केली आहे. आता रांग लागलीय. माझ्या लाडक्या व्यक्तींचे मी मनापासून आभारी आहे. सुकन्या मोने, हॅशटॅग दिल्याबद्दल आभारी आहे.” दोघांच्या नावाचं सुकन्या यांनी ‘आनंदी’ असा हॅशटॅग बनवला आहे. स्वानंदीच्या फोटोंवर चाहते मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वानंदी आणि आशिष येत्या डिसेंबरमध्ये पुण्यात लग्नगाठ बांधणार आहेत. दोघांचेही कुटुंबीय पुण्याचे असल्यामुळे त्यांनी लग्नासाठी पुणे हेच उत्तम ठिकाण निवडलंय. अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने २० जुलैला रिलेशनमध्ये असल्याची घोषणा केली होती. तिने सोशल मीडियावर जाहीर करताच तिच्या चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटी मित्रांनी ही या स्वीट कपलला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आमच्या दोघांचं ठरलंय’म्हणत स्वानंदीने त्यांचं लग्न ठरल्याची माहिती दिली होती. तर या दोघांचाही साखरपुडा २४ जुलैला पार पडला होता.

स्वानंदीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, स्वानंदी ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून प्रकाशझोतात आली होती. सोबतच गेल्या काही दिवसांपूर्वी स्वानंदी ‘अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई?’ या सिरीयलमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. स्वानंदी सिनेअभिनेते उदय टिकेकर आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांची लेक आहे. (Serial)

तर आशिष कुलकर्णी, आशिष एक गायक- संगीतकार असून तो Indian Idol च्या 12 व्या सीझनमध्ये सहभागी होता. आशिष कुलकर्णी स्वत:चे लाईव्ह शोज सुद्धा करतो. आशिष सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध गायक असून त्याचे सातासमुद्रापार गाण्यांचे कार्यक्रम देखील होत असतात. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha vijay live updates : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात कोण कोण भाषण करणार?

Aastha Poonia: नौदलात लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला पायलट; कोण आहेत सब लेफ्टनंट आस्था पुनिया?

Maharashtra politics : मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद टोकदार, शिंदेंनी दिला 'जय गुजरात'चा नारा

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

SCROLL FOR NEXT