Taali Web Series Official Teaser Out  Instagram @sushmitasen47
मनोरंजन बातम्या

Taali Teaser : सुष्मिता सेनच्या ‘ताली’चा टीझर प्रदर्शित ; 'गाली से ताली तक' श्रीगौरी सावंतचा थक्क करणार प्रवास

Sushmita Sen Web Series : तृतीयपंथी ऍक्टिविस्ट श्री गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित वेबसीरीजमध्ये सुष्मिता सेन दिसणार आहे.

Pooja Dange

Taali Web Series Official Teaser Out : सुष्मिता सेनची नवीन वेबसीरीज ताली लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. तृतीयपंथी ऍक्टिविस्ट श्री गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित वेबसीरीजमध्ये सुष्मिता सेन दिसणार आहे. या वेबसीरीजचा ऑफिशल टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

'ताली' ४६ सेकंदाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. जिओ सिनेमा, सुष्मिता सेन आणि मराठमोळा अभिनेता सुव्रत जोशी यांनी या वेबसीरीजचा टीझर त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेर केला आहे.

तालीचा टीझर

तालीच्या टीझरची सुरुवात गौरी सावंत यांच्या आवाजाने होते. त्यानंतर गौरी सावंत त्याची स्टोरी एका वाक्यात या टीझरमध्ये सांगण्यात आली आहे. तसेच गौरी सावंत यांच्या व्यक्तिमत्वातील बारकावे सुष्मिताच्या भूमिकेत दिसत आहेत.

गौरी सावंत यांच्या गळ्यातील साईबाबांचे लॉकेट, कपाळावरील मोठी टिकली, हावभाव, चाल सगळं सुष्मिताने उत्तम प्रकारे साकारलं आहे.

टीझर शेअर करताना सर्वांनी लिहिले आहे की, 'गाली से ताली ताक के सफर की यः कहाणी. पेश है भारत के तिसरे लिंग के लिए श्रीगौरी सावंत की लढाई कि कहानी.'

सुष्मिता सेनची मुख्य भुमिका असलेली ही वेबसीरीज 'ताली' १५ ऑगस्टला स्वतंत्र दैनच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. ही वेबसीरीज जिओ सिनेमावर फ्रीमध्ये पाहता येणार आहे.

दिग्दर्शक रवी जाधव यांनी या वेबसीरीजचे दिग्दर्शन केले आहे. तर क्षितिज पटवर्धन यांनी वेबसीरीजचे लेखन केले आहे. अर्जुन सिंह बारन, कार्तिक डी निशानदार आणि अफीफा सुलेमान नाडियाडवाला यांनी या वेबसीरीज निर्मिती केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: संतापजनक! मुलीने प्रपोज नाकारल्याने हॉटेल मालक संतापला, रिसेप्शनिस्टवर केला बलात्कार

Box Office Collection : 'थामा'च्या कमाईत चौथ्या दिवशी मोठी घसरण; 'एक दीवाने की दीवानियत'नं किती कमावले? वाचा कलेक्शन

हातपाय बांधले अन् गरम चटके; अनैतिक संबंधातून नांदेडच्या तरूणाची कर्नाटकात हत्या

EPFOचा मोठा निर्णय! पेन्शनच्या ५ नियमांत केले बदल; थेट खिशावर होणार परिणाम

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, कारण अस्पष्ट

SCROLL FOR NEXT