Sushmita sen Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sushmita Sen Heart Attack: सुष्मिताच्या हार्ट ॲटेकचं गुपित उलगडलं; सहकलाकाराने सांगितला शूटिंग दरम्यानचा किस्सा

सुष्मिता ‘आर्य ३’च्या शूटिंगसाठी जयपूरला असताना तिला हृदयविकाराचा झटका आला होता. यावर तिच्या सोबत असणाऱ्या सहकलाकाराने तो शूटिंग दरम्यानचा किस्सा सांगितला आहे.

Chetan Bodke

Sushmita Sen Heart Attack: बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनला गेल्या महिन्यात हृदयविकाराचा तिव्र झटका आला होता. घटनेच्या एका आठवड्यानंतर, सुष्मिताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना आरोग्याविषयी महत्वाची अपडेट दिली. सुष्मिताला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता.

मात्र सुष्मिताच्या हेल्थमध्ये दिवसेंदिवस सुधारणा होत असून ती लगेचच रॅम्पवॉकसाठी देखील उतरली होती, त्यामुळे तिच्यावर चहुबाजुंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुक होत होते. सोबतच हेल्थ अपडेट देताना रक्त वाहिन्यांमध्ये अनेक ब्लॉकेजेस असल्याची माहिती देखील दिली.

लवकरच सुष्मिता ‘आर्य ३’या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शूटिंग दरम्यान तिला जयपूरमध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. आर्यामध्ये सुष्मिता सेनसोबत विकास कुमार एसीपी खानची भूमिका साकारत आहे. एक दिवसाची शूटिंग पूर्ण केल्यानंतर ‘आर्य ३’ च्या टीमला समजले की त्यांना शूटिंगच्या तारखेत बदल करावा लागणार आहे.

न्यूज१८ सोबत संवाद साधताना विकास कुमार म्हणाले, ‘ ‘आर्य ३’ या वेबसीरिजची शूटिंग राजस्थानमध्ये सुरू होती. त्यात काही आऊटडोअर सीन्स आहेत, जे आम्हाला जयपूरमध्ये शूट करायचे होते. आम्ही तिथे पोहोचलो, पण दुर्दैवाने सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका आला. सुरुवातीला आम्हाला याबद्दल माहिती नव्हती, परंतु ज्यावेळी तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना कळवले तेव्हाच आम्हाला सुद्धा तिच्या हेल्थविषयी माहिती मिळाली.’

विकास कुमार पुढे म्हणाले, ‘ सुरुवातीला सुष्मितालाही कळत नव्हते की तिला स्वत:ला काय होत आहे? सर्व प्रकारच्या चाचण्या झाल्यानंतर कळले. आम्ही फक्त एक दिवस शूट केले आणि नंतर आम्हाला समजले की आम्ही पुढील शूट करू शकत नाही. यानंतर आम्ही वेबसीरिजच्या शूटिंगला बराच वेळेसाठी ब्रेक दिला.’

सुष्मिता सेनने 2 मार्च रोजी इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर करत हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती दिली होती. त्यावेळी तिने चाहत्यांना सांगितले की, हृदयविकाराच्या झटक्यानंतर तिची अँजिओप्लास्टी करण्यात आली. मात्र, आता सुष्मिता सेनच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. तिने योगासोबतच वर्कआऊटही करायला सुरुवात केली आहे.

सुष्मिता सेनचा आगामी चित्रपट ‘ताली’ हा एक अनोख्या विषयावर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात सुष्मिताने सामाजिक कार्यकर्त्या गौरी शिंदे यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. रवी जाधव या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: दीड लाख लाडक्या बहीण अपात्र, हफ्ता थांबला, चौकशीसाठी गर्दी

Mumbai Local Train: लोकल सेवा विस्कळीत; गाड्या २५ ते ३० मिनिटे उशिरा, VIDEO

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र सदनाचे बांधकाम करणारे चमणकर बंधू दोषमुक्त

Daytime Sleepiness Risks: दिवसा झोप काढताय? सावधान! होऊ शकतो 'हा' जीवघेणा आजार

Asia Cup 2025: आशिया कपमध्ये फूलऑन ड्रामा; PCBची धमकी, ICCचा नकार, पाकिस्तान संघाचं काय होणार?

SCROLL FOR NEXT