Jai Bhim Movie On Oscar Youtube Channel  Amazon Prime
मनोरंजन बातम्या

'जय भीमचं नाव जगी गाजतं' ऑस्करच्या यूट्यूब चॅनेलवर झळकणारा पहिला भारतीय सिनेमा ठरला Jai Bhim!

Jai Bhim Movie on Oscar Youtube Channel: तमिळनाडूमध्ये ९० च्या दशकात झालेल्या दलितांवरील अत्याचाराबाबत हा चित्रपट आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येक भारतीयाला गर्व वाटेल असं काम एका भारतीय सिनेमानं केलंय. दाक्षिणात्य सुपरस्टार सुर्याच्या (surya sivakumar) जय भीम चित्रपटाचं भारतात नव्हेच तर जगभर कौतुक झालं. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाने अनेक विक्रम मोडित काढले. आता या चित्रपटानं आणखी एक नवा रेकॉर्ड केला आहे. जय भीम (Jai Bhim Movie) हा चित्रपट ऑस्करच्या (Ocsar) अधिकृत यूट्यूब चॅनेलवर (Youtube Channel) झळकणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या टीमच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. (Jai Bhim: Suriya's Film Features On Oscars' YouTube Channel)

हे देखील पहा -

काही दिवसांपूर्वी IMDb ने 2021 मधील लोकप्रिय ठरलेल्या सिनेमांची यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये जय भीम (Jai Bhim) या चित्रपटाने पहिला क्रमांक पटकवला होता. तामिळनाडूमधील (Tamilnadu) सत्य घटनेवर आधारित चित्रपट जय भिम अॅमेझॉन प्राईमवर (Amazon Prime) रिलीज करण्यात आला होता. साऊथचा सुपरस्टार सुर्या सिवकुमारची (Suriya Sivakumar) मुख्य भुमिका असलेला हा चित्रपट तमिल, तेलुगु, हिंदी, कन्नड़ आणि मलयालम या पाच भाषांमध्ये प्रदर्शीत झाला. तमिळनाडूमध्ये ९० च्या दशकात झालेल्या दलितांवरील अत्याचाराबाबत हा चित्रपट आहे. यात सुर्या वकिलाच्या भुमिकेत असून चित्रपटाचा बहुतांश भाग कोर्टरुम ड्रामावर आधारित आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT