Surbhi Chandna Wedding Instagram
मनोरंजन बातम्या

Surbhi Chandna Wedding : 'इश्कबाज' फेम सुरभी चंदना अडकली लग्न बंधनात, विवाहसोहळ्याचा थाट पाहिलात का?

Surbhi Chandna Wedding photos : टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदना लग्न बंधनात अडकली आहे. सुरभीने बॉयफ्रेंड करण शर्मासोबत लग्न केलं आहे. सुरभीने जयपूरमधील चोमू पॅलेसवर लग्न केलं आहे.

Vishal Gangurde

Surbhi Chandna Wedding :

टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदना लग्न बंधनात अडकली आहे. सुरभीने बॉयफ्रेंड करण शर्मासोबत लग्न केलं आहे. सुरभीने जयपूरमधील चोमू पॅलेसवर लग्न केलं आहे. सुरभीच्या विवाहसोहळ्याचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. (Latest Marathi News)

टीव्ही अभिनेत्री सुरभीच्या विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहेत. तसेच विवाहसोहळ्याचा व्हिडिओही चर्चेत आहे. विवाहसोहळ्यातील सुरभीच्या लूकची जोरदार चर्चा होत आहे.

सुरभीचा ब्रायडल लूक चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. पेस्टल रंगाच्या कॉन्ट्रास लेहेंग्यात सुरभी सुंदर दिसत आहे. तिचा लेहेंगाही खूप आकर्षक दिसतोय. तसेच तिने पिच कलरची ओढणी गळ्यावर घेतली आहे. सुरभि तिच्यचा लूकने साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तर करणने ग्रे रंगाची शेरवानी आणि गोल्डन रंगाची पगडी घातल्याचे दिसत आहे.

सुरभी आणि करण हे दोघे गेल्या १३ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. या दोघांनी १३ वर्षांनी लग्न बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. वर्क फ्रंटविषयी बोलायचं झालं तर, सुरभीला 'इश्कबाज' मालिकेमुळे खूपच प्रसिद्धी मिळाली.

या मालिकेतील तिच्या पात्रामुळे तिला खरी प्रसिद्धी मिळाली. तिने टीव्ही इंड्रस्टीसोबत ओटीटीमध्येही डेब्यू केलं आहे. तर 'रक्षक इंडियाज ब्रेव्स चॅप्टर 2' या सीरीजमध्ये तिला काम करण्याची संधी मिळाली. या सीरीजमध्ये तिने लीड रोलसाठी काम केलं.

सुरभि आणि करणची लव्हस्टोरी

सुरभी चंदना आणि करण शर्मा हे दोघे एकमेंकांना गेल्या १३ वर्षांपासून डेट करत होते. त्यानंतर यो दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुरभीने कधी त्यांचं नातं सर्वांसमोर आणलं नाही. आता लग्नाच्या काही महिन्याआधीच करण शर्मासोबतचं तिचं नातं जाहीर केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यवतमाळमध्ये राष्ट्रवादीला धक्का, बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

विद्यार्थ्याचं हैवानी कृत्य; ४० वर्षीय महिलेवर शेतात बलात्काराचा प्रयत्न, नकार देताच डोक्यात विळा घातला

Peacock Lifespan: किती वर्षे जिवंत राहतो भारताचा राष्ट्रीय पक्षी, उत्तर वाचून व्हाल थक्क

Dharmendra Health Update:ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली; कुटुंबातील सर्व सदस्य पोहोचले रुग्णालयात

Pani Puri Receipe: नेहमीचं चटपटीत पाणी सोडा, पाणीपुरीसाठी ५ मिनिटांत बनवा स्ट्रीट स्टाईल झणझणीत पाणी

SCROLL FOR NEXT