Nikki And Suraj SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : सूरजाचा तो एक प्रश्न निक्कीला टाकतो कोड्यात, म्हणाली...

Nikki And Suraj : बिग बॉसच्या घरात निक्की आणि सूरजमध्ये अरबाजवरून चर्चा रंगते. पाहा निक्की अरबाजविषयी काय बोलते?

Shreya Maskar

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marath) घरात सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. प्रत्येकजण ट्रॉफीसाठी लढताना पाहायला मिळत आहे. बिग बॉस घरात अनेकांची नाती जुळली तर काहींच्या मैत्रीत फूट पडली. यंदा संपूर्ण पर्वात निक्की आणि अरबाज यांच्या मैत्रीची चर्चा पाहायला मिळाली आहे. अरबाज घराबाहेर पडल्यानंतर निक्कीला मोठा धक्का बसतो. ती खूप रडते. तिच्यासाठी अरबाजचं जाण अनपेक्षित असते.

आता बिग बॉस घरात प्रत्येकाचे कुटुंब येऊन आपल्या सदस्यांना भेटत आहे. यामुळे घरातील सदस्य खूप खुश झाले आहेत. आपल्या कुटुंबाला भेटून प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी आलेले पाहायला मिळाले आहे. निक्कीची आई देखील या वीकमध्ये घरात निक्कीला भेटायला येते. तेव्हा निक्कीची आई निक्कीला म्हणते की, "अरबाजची इंगेजमेंट झाली आहे" या घटनेनंतर निक्की प्रचंड भडकते आणि गोंधळते. त्यानंतर निक्की रागात येऊन अरबाजचे कपडे एका पिशवीत भरून स्टोअर रुममध्ये ठेवते आणि बिग बॉसला ते फेकून देण्यास सांगते.

आता सूरज (Suraj Chavan) निक्कीसोबत अरबाजवर चर्चा करताना पाहायला मिळणार आहे. सूरज निक्कीला म्हणतो, तुझ्या डोक्यातून सर्व काढून टाक. याचा तुला त्रास होतोय. तो १० मुली फिरवेल, तुझं काय? पुढे सूरज बोलतो की, प्रेम कसं असावं माहितीये का? एकीवरच कराव पण ते जीवापाड असावं.” यावर निक्की बोलते खरंय. यावर सूरज बोलतो की, मन भरलं की सोडायच हे मला खटकते. असे वाटतं की डोक्यात बाटल्या फोडाव्या. यावर मलाही तसंच वाटत अस म्हणतं निक्की सूरजला दिजोरा देते. पुढे सूरज निक्की ला म्हणतो की, आई-बाबांच ऐकायला पाहिजे कारण ते आपले देव असतात. यावर निक्की म्हणते की, मी ऐकते म्हणून मला त्रास होत आहे. अरबाजने मला सगळं खरं का नाही सांगितलं.”

शेवटी सूरज निक्कीला (Nikki Tamboli ) विचारतो की, "तू अरबाजवर प्रेम करते का?" त्यावर निक्की म्हणते "मला अरबाज आवडायचा. तो माझ्यासाठी खूप काही करत होतो. हे काय होत मग." यावर सूरज म्हणतो की,"मला तर तुझंच प्रेम आहे असं वाटत आहे." त्यानंतर सूरजने एलिमिनेशन च्या दिवसाशी घडलेला प्रकार सांगितला. यात सूरज बोलतो की, एलिमिनेशनच्या वेळी त्यांने तुला सोडून दिल होतं. तू पडली, रडली आणि आरडाओरडा केला. त्याच्या डोळ्यातून पाणी तरी आलं का? तो तसाच गेला बाहेर. पुढे निक्की म्हणते मला याचेच आश्चर्य वाटत आहे. आता घराबाहेर गेल्यानंतर निक्की आणि अरबाजच्या नात्यांचे काय होणार? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तसेच बिग बॉसची टॉफी कोण घेऊन जाणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT