Supreme Court On Samay Raina Saam Tv
मनोरंजन बातम्या

Samay Raina: समय रैनाला कोर्टाने झापलं, दिव्यांगांची चेष्टा करण्यावरून SC नाराज, दिले हे आदेश

Supreme Court: सुप्रीम कोर्टाने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय देत सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सना फटकारले आहे. कॉमेडियन समय रैना याच्यासह काही यूट्यूबर्स आणि पॉडकास्ट होस्टनी दिव्यांगांवर उपहासात्मक टिपणी करण्यावर आळा घातला आहे.

Shruti Vilas Kadam

Supreme Court On Samay Raina: सुप्रीम कोर्टाने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय देत सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सना फटकारले आहे. कॉमेडियन समय रैना याच्यासह काही यूट्यूबर्स आणि पॉडकास्ट होस्टनी दिव्यांग व्यक्तींवर उपहासात्मक आणि अपमानास्पद वक्तव्ये केली होती. या संदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने स्पष्ट केले की, “अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे इतरांच्या भावना दुखावणे नव्हे.”

न्यायालयाने समय रैना आणि इतर संबंधित इन्फ्लुएंसर्सना सार्वजनिकरीत्या माफी मागण्याचा आदेश दिला आहे. त्यांनी ज्या माध्यमांवर हे वक्तव्य केले त्या सर्व प्लॅटफॉर्मवर त्यांना व्हिडिओ किंवा पोस्टच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त करावी लागणार आहे. कोर्टाने चेतावणी दिली की जर त्यांनी माफी मागितली नाही तर त्यांच्या विरोधात आर्थिक दंड आणि कठोर कारवाई केली जाऊ शकते.

या प्रकरणात ‘CURE SMA फाउंडेशन ऑफ इंडिया’ या संस्थेने कोर्टात अर्ज दाखल केला होता. ही संस्था दुर्मिळ आजार असलेल्या दिव्यांग मुलांसाठी कार्य करते. संस्थेने मांडले की अशा प्रकारचे कंटेंट दिव्यांगांचा अपमान करतात आणि समाजात चुकीचा संदेश पसरवतात.

सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या एकलपीठाने केंद्र सरकारलाही धारेवर धरले आणि स्पष्ट केले की अशा घटनांवर आळा घालण्यासाठी ठोस मार्गदर्शक तत्त्वे तातडीने आणली पाहिजेत. दिव्यांग, महिला, मुले आणि वरिष्ठ नागरिकांवर आधारित अपमानास्पद कंटेन्टला आळा घालण्याची जबाबदारी सरकारवर टाकण्यात आली आहे.

न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या एकलपीठाने सुनावणीत म्हटले, “आज दिव्यांगांवर थट्टा होते, उद्या इतरांवर होईल. या स्वातंत्र्याला मर्यादा असल्या पाहिजेत.” कोर्टाचा हा कठोर सूर पाहता, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सना आता पुढील काळात त्यांच्या भाष्याबाबत अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hero चा धमका! लाँच केली Activaहून स्वस्त स्कूटर, जाणून घ्या किंमत अन् बरंच काही

EPFO Rule: मोठी बातमी! पैसे काढण्याच्या नियमात होणार बदल; सरकारच्या नव्या नियमामुळे ७ कोटी पीएफधारकांना होणार फायदा

कोकणात राज ठाकरेंना डबल धक्का, वैभव खेडेकरनंतर आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर

Ambad News : नदीच्या पुरात रस्ता बंद; रुग्णालयात नेता न आल्याने आजीच्या खांद्यावरच नातवाने सोडले प्राण, अंबड तालुक्यातील घटना

पोलिसांच्या व्हॅनवर चढून कपलचा धिंगाणा, एकमेकांना मिठ्या मारत शिवीगाळ अन्..., पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT