Manoj Bajpayee on her Daughter Instagram @bajpayee.manoj
मनोरंजन बातम्या

Manoj Bajpayee Movies: मनोज वाजपेयीला फक्त एकाच गोष्टीची खंत; बाप बॉलिवूडचा स्टार, पण लेकीला...

Manoj Bajpayee Daughters Story : मनोज वाजपेयीने मनातील खंत बोलून दाखवली आहे.

Pooja Dange

Manoj Bajpayee on her Daughter : उत्कृष्ट संवादफेक आणि अभिनय पडद्यावर जिवंत करणारा 'बाप'माणूस म्हणजे मनोज वाजपेयी. पण बॉलिवूडच्या 'बाप'माणसाला बाप म्हणून एका गोष्टीची खंत वाटते. ती त्यानं जाहीरपणे बोलूनही दाखवली आहे.

'द फॅमिली मॅन' सीरीज फेम अभिनेता मनोज वाजपेयीनं (Manoj Bajpayee) आपल्या अभिनयाने अनेक चाहत्यांची मनं जिंकली आहेत. मनोज वाजपेयी हा तगड्या अभिनयामुळे प्रसिद्ध आहे. परंतु त्याला एका गोष्टीची खंत वाटते. त्याची मुलगी अवा हिला हिंदी येतच नाही, असे त्याने सांगितले.

मनोज वाजपेयी हा हिंदी चित्रपटसृष्टीतील (Bollywood Film) प्रसिद्ध कलाकार आहे. प्रत्येक वेळेस नवीन भूमिकेने चाहत्यांची मने नव्याने जिकंताना दिसत आहे. सध्या त्याचा 'एक बंदा काफी है' (ek banda kafi hai) या चित्रपटाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. नुकतीच एका मीडिया हाऊसने त्याची मुलाखत घेतली. त्यावेळी त्याने आपल्या मनातील खंत बोलून दाखवली.

मनोज वाजपेयीच्या मुलीला प्रचंड आवडतो 'टायगर'

मनोज वाजपेयीने 'पिंकविला'शी बोलताना बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. "अवा पहिल्यांदा बागी २ च्या सेटवर आली होती. अहमद खानने तिचे स्वागत केले. त्यांनी एका सीनसाठी अॅक्शनही म्हटले. तिला प्रेमाने जवळ केले. नंतर ती माझ्या व्हॅनमध्ये आली आणि म्हणाली, " टायगर श्रॉफ कुठे आहे?" तिला हिंदी वैगरे काही शिकायचं नाही, पण तिला हिंदी चित्रपटाचे नायक आवडतात." असे मनोजने सांगितले.

हिंदीत बोलत नाही म्हणून मुलीला रागावतो मनोज वाजपेयी

मनोज वाजपेयी म्हणाला , "पूर्ण इंग्रजी आहे ती. तिला ओरडा पडत असतो, तरीही ती हिंदी (Hindi) बोलत नाही. कल्पना करा तिच्या शिक्षकांसोबत काय झाले असेल. शिक्षक-पालक मीटींगमध्ये तिच्या शिक्षकांनी सांगितले की, मनोजजी, तुमची मुलगी माझ्या वर्गात आहे हे ऐकून मला फार आनंद झाला. त्यांनी पुढे सांगितले की, "ती बिलकुल हिंदी बोलत नाही.' ती म्हणते, "मला हिंदी येते." मी विचारले, तुझ्या वडिलांचं नाव सांग, त्यावर ती म्हणाली "माय पापा... "... ही माझ्यासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे." (Latest Entertainment News)

फॅमिली मॅन ३ मध्ये दिसणार प्रमुख भूमिकेत

मनोज वाजपेयीनं त्याच्या आगामी वेबसीरीजविषयी माहिती दिली. येत्या काही दिवसांत मनोज वाजपेयी राज डीके यांच्या लोकप्रिय सीरीज 'फॅमिली मॅन ३' मध्ये दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

SCROLL FOR NEXT