Vijay Settupeti's First Hindi Film : किडनॅप करायचं होतं एकाला, प्रत्यक्ष केलं दुसऱ्यालाच...किडनॅप कुणाचं तर कुख्यात गँगस्टरच्या मुलाचं...त्यामुळं सगळा घोळ झाला. क्षणाक्षणाला उत्कंठा शिगेला पोहोचवणारा अवघ्या १. ३८ सेकंदाचा 'मुंबईकर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. विशेष म्हणजे दाक्षिणात्य इंडस्ट्रीतला सुपरस्टार विजय सेतूपती याचा हा बॉलिवूडमधला पहिलाच चित्रपट आहे.
विजय सेतूपती हे नाव साउथ इंड्रस्ट्रीत फेमस आहे. आता हा स्टार हिंदीत पहिल्यांदाच एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. या आधीही त्याने शाहीद कपूरसोबत 'फर्जी ' या चित्रपटात दिसला होता. विजय सेतूपतीने 'फर्जी' या चित्रपटाआधी 'मुंबईकर' हा चित्रपट साइन केला होता. परंतु, लॉकडाउनमुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. 'मुंबईकर' या चित्रपटात विक्रांत मैसी व रणवीर शौरीही दिसणार आहे.
साउथचा स्टार विजय सेतूपतीने जेव्हा शाहीद कपूरसोबत 'फर्जी'मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता, तेव्हाही त्याचे चाहते प्रचंड खूश होते. विजय सेतूपतीचे हिंदी सिनेमातील पदार्पण मानले जात होते. (Latest Entertainment News)
परंतु आता त्याचा पहिला ऑफिशियल प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून विजय सेतूपती पहिल्यांदाच हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या फिल्मचा ट्रेलर लॉंच झाला असून चाहत्यांनी ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
'फर्जी'च्याही आधी ह्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. 'मुंबईकर'चं शूटींगही लॉकडाउनमध्ये झालं होतं परंतु चित्रपट प्रदर्शित झाला नाही. चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आता हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
'मुंबईकर' या चित्रपटामध्ये विजय सेतूपतीसोबत अजूनही कलाकार दिसणार आहेत. विक्रांत मैसी व रणवीर शौरी यांसारखे कलाकार नवीन भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ट्रेलर बघून असं वाटतंय की खूप काही गोंधळ उडालेला दिसत आहे. याचबरोबर डार्क कॉमेडी यांचा संगम पाहायला मिळणार आहे. चाहत्यांचाही ट्रेलरला जबरदस्त प्रतिसाद मिळाल्याचे कॉमेंटमधून दिसून येत आहे.
ट्रेलरमध्ये नक्की काय?
'मुंबईकर'च्या ट्रेलरमध्ये विजय सेतूपती गॅंगस्टरच्या भूमिकेत दिसत आहे. "मुंबई मेरी जान" हा डायलॉग बोलताना तो दिसत आहे. ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे विजय सेतूपतीने चुकून रणवीर शौरीच्या मुलाचे अपहरण केल्याचे दिसत आहे. त्याला दुसऱ्याच कोणाचे अपहरण करायचे असते.
या सर्व गोंधळाने त्याच्यासमोर खूप मोठं संकंट उभं राहिल्याचं दिसत आहे. खरी कसोटी तेव्हा लागते, जेव्हा तो मुलगा पळून जातो. रणवीर शौरी हा खूप मोठा डॉन आहे आणि त्याच्या मुलाचे विजय सेतूपतीने अपहरण करून नवीन संकट स्वत: वरच ओढवून घेतलेलं दिसतं. डॉनचा मुलगा विक्रांत मैसीला सापडतो. डॉनने त्याच्या मुलाला शोधणाऱ्याला १ कोटींचं बक्षीस ठेवलं. तर आता विक्रांत मैसी ते बक्षीस मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो.
चाहत्यांनी केले कौतुक.....
'मुंबईकर'चा ट्रेलर पाहून चाहते भलतेच खूश झाल्याचे दिसत आहे. त्यांच्या आनंदाचं कारण म्हणजे विजय सेतूपतीचं हिंदी चित्रपटसृष्टीतील पदार्पण. चाहत्यांनी सोशल मीडियावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. "चित्रपटाची आतूरतेने वाट पाहत आहे.
यावेळेस हिंदी अनुवाद किंवा डबिंगची वाट पाहावी लागणार नाही, " असे एका चाहत्यानं म्हटलं आहे. " प्रत्येक वेळेसारखे या वेळेसही विजय सेतूपती आपल्या स्टाइलने चाहच्यांची मनं जिकणार आहे," असे अन्य एका चाहत्याने कमेंट केली आहे. अनेक कलाकरांनी या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे आणि संपूर्ण 'मुंबईकर' टीमचे अभिनंदन केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.